मुंबई : तेल कंपन्या प्रत्येक महिन्याला एलपीजी गॅसच्या दरांचा आढावा घेतात. प्रत्येक राज्यात टॅक्स वेगवेगळा आकारला जातो. यामुळे एलपीजी घरगुती गॅसच्या दरात फरक पाहायला मिळतो. देशातील ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी विना अनुदानित एलपीजी घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत सप्टेंबरमध्ये बदल केलेले नाहीत. १९ किलो सिलेंडरच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे.
आयओसीएल वेबसाइटनुसार, ऑगस्ट महिन्यात जे दर होते तेच सप्टेंबर महिन्यात असणार आहेत. दिल्लीत १४.२ किलो विना अनुदानित सब्सिडी एलपीजी सिलेंडर ५९४ रुपये आहे. कोलकातामध्ये याचा दर ६२०.५० रुपये, मुंबई ५९४ रुपये आणि चैन्नईत ६१०.५० रुपये आहे.
आईओसीएलने दिलेल्या वेबसाईट माहितीनुसार, ऑगस्ट महिन्यात जे दर होते. तेच सप्टेंबर महिन्यात असणार आहेत. दिल्लीत १४.२ किलो विना अनुदानित एलपीजी सिलेंडर ५९४ रुपये, कोलकाताचा दर ६२०.५० रुपये, मुंबई ५९४ रुपये आणि चैन्नई ६१०.५० रुपये आकारणार आहे.
१९ किलो सिलेंडरच्या किंमतीत बदल झाला आहे. दिल्लीत ११३५.५० रुपयावरून दर कोसळले असताना ११३३.५० रुपये. कोलकातामध्ये ११९८.५० रुपयावरून ११९६.५० रुपये आहे. मुंबईत १०९१ रुपये १०८९ रुपये दर आहे. चैन्नई १२५३ रुपयावरून कमी होऊन १२५० रुपये झाले आहे.