हुश्शss! गॅस सिलिंडर तब्बल 157 रुपयांनी स्वस्त, नवी किंमत काय?

LPG Price Cut: तेल, भाज्या, डाळी आणि तांदुळ यामोमाग आता आणखी काय काय महाग होणार असाच उद्विग्न प्रश्न सर्वसामान्यांनी विचारण्यास सुरुवात केली असतानाच एक महत्वाची बातमी समोर आली.   

सायली पाटील | Updated: Sep 1, 2023, 08:28 AM IST
हुश्शss! गॅस सिलिंडर तब्बल 157 रुपयांनी स्वस्त, नवी किंमत काय?  title=
LPG Price Cut by rs 157 big change from september latest update

LPG Price Cut: देशात दर महिन्याच्या पहिल्या तारखेला काही महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. यामध्ये इंधनाची दरवाढ किंवा दरांमध्ये कपात, (Bank Rules) बँकांच्या नियमांमध्ये बदल, वाहतुकींचे बदल यांचा समावेश असतो. सर्वसामान्यांच्या आयुष्यावर परिणाम करणाऱ्या या बदलांमधील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गॅस दरांबाबतचा. आगामी (Loksabha Elections) लोकसभा निवडणुका आणि एकंदर परिस्थिती पाहता केंद्र शासनानं ऑगस्ट महिन्याअखेरीस घरगुती गॅस दरांमध्ये 200 रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला. 

शासनाचा हा निर्णय अनेकांच्या पचनी पडत नाही तोच सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या तारखेलाही असाच एक निर्णय घेण्यात आला. जिथं व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरांमध्येही कपात करण्याचा निर्णय घेतला गेला. अधिकृत वृत्तानुसार 1 सप्टेंबरपासून इंधन कंपन्यांकडून व्यावसायिक वापरातील एलपीजी सिलिंडर दरांमध्ये घट झाली आहे. इथून पुढं हे सिलिंडर 1522.50 रुपयांना विकले जाणार आहेत. यापूर्वी ऑगस्ट महिन्यातही गॅस दर 100 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तर, जुलै महिन्यात मात्र सिलिंडरचे दर वाढले होते. 

दरांमधील फरक समजून घ्या... 

इंधन कंपन्यांच्या निर्णयानंतर आता 19 किलो वजनाचा व्यावसायिक वापरातील एलपीजी आता 1680 ऐवजी 1522.50 रुपयांना विकला जाणार आहे. म्हणजेच या दरांमध्ये 157 रुपयांची घट नोंदवण्यात आली आहे. दिल्लीतही हेच दर लागू असतील. तर, मुंबईत 1640.50 रुपयांना मिळणारा सिलिंडर आता 1482 रुपयांना विकला जाणार आहे. त्यामुळं हा एक मोठा दिलासा ठरत आहे. 

हेसुद्धा पाहा : विजांचा कडकडाट, स्फोट आणि प्रचंड वेग.... अवकाशातून असं दिसतं चक्रीवादळ, पाहा Video 

घरगुती सिलिंडर दरातील घट कोणासाठी फायद्याची? 

30 सप्टेंबरपासून सरकारनं घरगुती एलपीजी सिलिंडर 200 रुपयांनी स्वस्त करण्याचा निर्णय घेतला. यानंतर 14.2 किलो वजनाच्या या सिलिंडरचे दर बऱ्याच अंशी कमी झाले. दरात झालेली ही घट उज्वला योजनेतील नागरिकांना मोठा फायदा देणार आहे. आतापर्यंत देशातील 10 कोटी लाभार्थ्यांना शासनाच्या वतीनं 200 रुपयांचं सब्सिडी दिली जात होती. ज्यानंतर हा आकडा वाढून 400 रुपयांवर पोहोचला आहे म्हणजेच नव्या बदलानंतर त्यांना सिलिंडरसाठी 903 रुपये भरावे लागणार आहेत आणि यावरही 200 रुपयांची सवलत असल्यामुळं एका सिलिंडरसाठी 703 रुपये भरणं अपेक्षित असेल.