चेन्नई : गेल्या दहा वर्षांपासून सत्तेत असलेल्या AIADMK ला पराभूत करून एमके स्टालिन यांचा पक्ष DMK ने तामिळनाडूमध्ये सत्ता जिंकली. या विजयाबद्दल स्टॅलिन यांचे अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून अभिनंदन करण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही काल २ मे, रविवारी ट्वीटरमार्फत तामिळनाडूमधील DMK पक्षाचे अभिनंदन केले.
ट्वीटरवर त्यांनी राज ठाकरे यांनी असा संदेश दिला की, 'भाषिय आणि प्रांतीय अस्मितेच्या राजकरणाला एम. करुणानिधि यांनी ज्या प्रकारे महत्त्व दिले, त्याच प्रकारे त्यांचे पुत्र एम के स्टॅलिन देखील देतील आणि राज्यासाठी काम करतील आशी आशा आहे.' त्यावर स्टॅलिन यांनी ही ट्वीटरच्या माध्यमातून राज ठाकरेंचे आभार मानले.
"तामिळनाडू विधानसभेत स्टॅलिन यांच्या नेतृत्वात DMK पक्षा मिळालेल्या विजयासाठी स्टॅलिन आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन. भाषिक आणि प्रांतीय अस्मितेच्या राजकारणाला एम. करुणानिधि यांनी नेहमीच महत्त्व दिले. तुम्ही त्याच भूमिकेला निष्ठेने निभावता आणि राज्याच्या स्वायत्ततेबद्दल आशावादी राहाल, अशीआशा मी व्यक्त करतो. पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन. " असे राज ठाकरे यांनी ट्वीट केले.
राज ठाकरे यांच्या ट्वीटला उत्तर देत स्टालिन यांनी ट्वीट केले की, "राज ठाकरे ... तुमच्या शुभेच्छांबद्दल आभारी आहे ... होय, माझ्याकडून भाषिक समानता, प्रांतीय अस्मिता आणि राज्यांची स्वायत्तेला प्राधान्य दिले जाईल"
एम. करुणानिधी आणि जयललिता यांच्या राजकरणाच्या समाप्तीनंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक होती. रविवारी आलेल्या या निवडणुकीच्या निकालात DMK आणि त्यांच्या मित्रपक्षांना बहुमत मिळाले आहे. विधानसभेतील 234 सदस्यांच्या जागांमध्ये DMK ला 131 जागा मिळाल्या आहेत. जर DMK आघाडीने कँग्रेस, डाव्या व इतर मित्रपक्षांसह युतीने जिंकलेल्या जागांचा समावेश केला तर, DMK युतीच्या एकूण 160 जागा आहेत.
दुसरीकडे AIADMK 10 वर्षे सत्तेत राहिले आणि जयललिता यांच्या निधनानंतर AIADMKने आपले चांगले कार्य न दाखवल्यामुळे 66 जागांवरच समाधान मानावे लागले. या पक्षाला भाजपाचा पूर्ण पाठिंबा होता, परंतु त्याचा फारसा फायदा झाला नाही. चित्रपट अभिनेता कमल हासन यांनीही 'मक्कल निधी मायम' नावाचा पक्ष स्थापन करून निवडणूक लढविली, परंतु त्यांची एकमेव सीट वगळता त्यांचा पक्ष काही खास कामगिरी करु शकला नाही.
Thank you @RajThackeray for your wishes.
I will continue to advocate the cause of linguistic equality, state autonomy and regional identity. https://t.co/6EMfofssm4
— M.K.Stalin (@mkstalin) May 2, 2021
रशियाचे माझी राष्ट्रपती स्टॅलिनच्या निधन झाल्याने माजी अध्यक्ष यांच्या निधनानंतर एम. करुणानिधी त्यांच्या शोक कार्यक्रमात उपस्थित होते, तेव्हा त्यांना पुत्र प्राप्तीचा संदेश मिळाला. त्यामुळे स्टॅलिन यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एम. करुणानिधी यांनी आपल्या मुलाचे नाव स्टॅलिन ठेवले. स्टॅलिन सुरुवातीपासूनच आक्रमक आणि बंडखोर आहे. असं म्हंटले जाते की एम. करुणानिधीच्या उपस्थितेतही स्टॅलिन यांनी मुख्यमंत्री होण्याची घाई होती.
त्यावर म. करुणानिधीने असे म्हंटले की, कधीही कोणतेही पद आपल्या वडिलांकडून मागून घ्यायचे नाही. त्याला स्वत: मिळवायचे असते. लोकांमध्ये काम करून हे पद मिळावे अशी वडिलांची मागणी करून कोणतेही पद घेऊ नये. जनते सोबत आणि जनतेसाठी काम करुन तु ते पद मिळव. असा सल्ला ही करुणानिधी यांनी स्टॅलिनला दिला. करुणानिधीनंतर कोण काम करणार यावर स्टॅलिन आणि त्याच्या भावात बरऱ्याचदा वाद झाले.
2009मध्ये स्टॅलिन यांची उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्ती झाली. उपमुख्यमंत्री पदाव्यतिरिक्त, चेन्नई सरकारमध्ये ग्रामविकास मंत्री होते. करुणानिधी यांच्या निधनानंतर त्यांनी DMK च्या दोऱ्या आपल्या हातात घेतल्या. राज्यभर दौरा करून पक्षाला बळकटी दिली आणि कँग्रेस, डाव्यांसोबत युती करून विधानसभेत आपल्या पक्षाचा विजय निश्चित केला.