Viral Video: मेरा दिल ये पुकारेsss पाकिस्तानी मुलीची केली हुबेहुब नक्कल; पठ्ठ्यानं लावली इंटरनेटवर आग!

Man recreates Pakistani girl dance: व्हिडिओमध्ये पाकिस्तानी वधूला सलवार-सूटमध्ये (Pakistani girl dance On Mera Dil Ye Pukare Aaja) दिसत आहे. लता मंगेशकर यांच्या मंत्रमुग्ध गाण्यावर पाकिस्तानी मुलीने कमालीची अदाकारी दाखवली होती. त्यानंतर आता...

Updated: Nov 23, 2022, 12:16 AM IST
Viral Video: मेरा दिल ये पुकारेsss पाकिस्तानी मुलीची केली हुबेहुब नक्कल; पठ्ठ्यानं लावली इंटरनेटवर आग! title=
pakistani girl dance

Trending Dance Video: बॉलिवूड चित्रपट आणि गाण्यांनी जगभरात वेड लावलंय. पाकिस्तानात देखील हिंदी गाण्याचे (Bollywood Hindi Hit Songs) अनेक चाहते आहेत. दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानातील नव्या नवरीचा व्हिडीओ (Pakistani Girl Dance) तुफान व्हायरल झाला होता. लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या आवाजातील 'मेरा दिल ये पुकारे आजा', या गाण्यावर (Mera Dil Ye Pukare Aaja) पाकिस्तानी नवरीने डान्स केला होता. हा व्हिडीओ जगभर व्हायरल झाला. त्यानंतर आता एका पठ्ठ्याचा नवा व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय.

व्हिडिओमध्ये पाकिस्तानी वधूला सलवार-सूटमध्ये (Pakistani girl dance On Mera Dil Ye Pukare Aaja) दिसत आहे. लता मंगेशकर यांच्या मंत्रमुग्ध गाण्यावर पाकिस्तानी मुलीने कमालीची अदाकारी दाखवली होती. त्यानंतर आता याच गाण्यावर एका तरुणाने पाकिस्तानी पोरीची हुबेहुब नक्कल (Man recreates Pakistani girl dance) केल्याचं दिसतंय. या पठ्ठ्याचा व्हिडीओ देखील व्हायरल होताना दिसतोय.

आणखी वाचा - Viral Video: व्हा बेटा व्हा! तुझी जागा रस्त्यावर नाही; पोराचं टॅलेंट पाहून तुम्हीही मंत्रमुग्ध व्हाल!

व्हायरल झालेला हा व्हिडिओ अरसलान खान (the_arsalaan_khan) नावाच्या युजरने इंस्टाग्रामवर (Instragram Video) शेअर केला आहे. मुंबईचा असलेला अरसलान हा व्हायरल डान्स आपल्या खास शैलीत परफॉर्म करताना दिसतोय. 'मेरा दिल ये पुकारे आजा' हे गाणं (Mera Dil Ye Pukare Aaja) 1954 मध्ये आलेल्या 'नागिन' चित्रपटातील आहे. हे गाणे बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री वैजयंती माला यांच्यावर चित्रित करण्यात आलंय.

पाहा Video -

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by @the_arsalaan_khan

दरम्यान, 'प्रत्येक वेळी मी माझे इन्टाग्राम (Instagram Feed) स्क्रोल फीड रीफ्रेश करताना हेच पाहतो. जेव्हा मीच विचार करतो.. मीच करतो', असं कॅप्शन अरसलानने लिहिलं आहे. हा व्हिडीओ अनेक मिम्स पेजेसने (Memes pages) देखील शेअर केलाय. त्यावर देखील भन्नाट कमेंट पहायला मिळत आहेत.