तीन तलाकविरोधात तातडीने कायदा करु : मनेका गांधी

संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या तीन तलाकप्रकरणी आज सुप्रीम कोर्टाने अंतिम निकाल दिला. कोर्टाने तीन तलाकचा चेंडू केंद्र सरकारकडे टोलवत सहा महिन्यात कायदा करण्याचा आदेश संसदेला दिला आहे. कायदा तयार होईपर्यंत तीन तलाकवर बंदी घालण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे मुस्लीम महिला आनंद व्यक्त करत आहेत तर सरकारनेही या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

Updated: Aug 22, 2017, 04:44 PM IST
तीन तलाकविरोधात तातडीने कायदा करु : मनेका गांधी title=

नवी दिल्ली : संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या तीन तलाकप्रकरणी आज सुप्रीम कोर्टाने अंतिम निकाल दिला. कोर्टाने तीन तलाकचा चेंडू केंद्र सरकारकडे टोलवत सहा महिन्यात कायदा करण्याचा आदेश संसदेला दिला आहे. कायदा तयार होईपर्यंत तीन तलाकवर बंदी घालण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे मुस्लीम महिला आनंद व्यक्त करत आहेत तर सरकारनेही या निर्णयाचं स्वागत केलं आहे.
 
केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. त्यांनी म्हटलं की, अनेक वर्षांपासून महिला पीडित आहेत. आपल्या धर्मातील अर्धी संख्या पीडित असावी, असं कोणत्याही धर्माला वाटणार नाही, असं त्यांनी नमूद केलं. सरकार तीन तलाकविरोधात लवकरच कायदा करेल. तातडीने कायदा बनवण्यास कोणतीही अडचण येणार नाही, संविधानात सर्वांसाठी समान अधिकार आहे असं मनेका गांधी यांनी म्हटलं. तिहेरी तलाकविरोधातील हे लहान पण उत्तम पाऊल आहे. आपल्याला खूप पुढे जायचं आहे. परंपरांचा आदर आहे, मात्र आयुष्य उद्ध्वस्त करणार्‍या परंपरा या काळानुरुप बदलायला हव्यात, असंही त्यांनी म्हटलं.