नवी दिल्ली : मणिपूर दहशतवादी हल्ल्यात आसाम रायफलच्या सात जणांनी आपले प्राण गमावले आहेत. एका कर्नलसमवेत चार जवान शहिद झाले आहेत. तसेच कर्नलच्या कुटूंबातील दोन सदस्यांचे देखील निधन झाले आहे. दहशतवाद्यांविरूद्ध मोठी कारवाईच्या चर्चा होत असताना, या हल्ल्याची जबाबदारी Manipur Naga People's Front (MNPF) ने घेतली आहे.
मणिपूर हल्ल्याची MNPF ने घेतली जबाबदारी
मणिपूरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेतल्यानंतर आसाम रायफलने परिपत्रक जारी केले आहे. त्यामध्ये शनिवारच्या घटनेबाबत सविस्तर मांडण्यात आले आहे. परिपत्रकात म्हटले की, हल्ला करणाऱ्यांना माहित नव्हते की, तुकडीमध्ये कर्नल आणि त्याचा मुलगा देखील होता.
तुकडीला देण्यात आलेल्या नोटमध्ये संवेदनशील परिसरात जवानांनी परिवाराला सोबत घेऊ नये अशा सूचना देण्यात आल्या होत्या. तो परिसर अतिशय संवेदनशील असून तेथे परिवाराचे राहणे योग्य नाही. अशादेखील सूचना देण्यात आल्या होत्या.
संघटनेचे प्रचार सचिव रोबेन खुमान आणि थॉमस यांनी संयुक्त ही जबाबदारी स्विकारली आहे. आता सरकार या संघटनेवर कारवाई कधी करते हे येत्या दिवसांमध्ये स्पष्ट होणार आहे.
मणिपूरचे मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांनी म्हटले आहे की, दहशतवाद्यांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल.
नक्षलवादी हल्यात शहीद विप्लव आणि त्यांच्या पत्नी, मुलाचा मृतदेहावर रविवारी अतिंम संस्कार करण्यात येणार आहे.