'या' मंदिरात 480 वर्षांपासून सुरु आहे अखंड ज्योत, या कामांसाठी होतो वापर

जाणून घेऊया कुठे आहे हे मंदिर

Updated: Nov 5, 2022, 02:38 PM IST
'या' मंदिरात 480 वर्षांपासून सुरु आहे अखंड ज्योत, या कामांसाठी होतो वापर  title=

मुंबई : भारतात मंदिर आणि देवांचं स्थान खूप मोठं आहे. मंदिरात भक्तांची श्रद्धा आणि भक्ती याशिवाय देवाची लीला आणि चमत्कार आजही आपल्याला पाहायला मिळतात. सध्या मथुरेतील वृंदावन धामच्या सप्तदेवालयांमध्ये समाविष्ट असलेल्या ठाकूर जी राधारमण लाल जू मंदिराची चर्चा सर्वत्र सुरु आहे. येशे देवाचा चमत्कार आणि त्यांची लीला पाच शतकांपासून सुरु आहे. मंदिरातील देवाची ही लीला पाहून तुम्हालाही आश्चर्य होईल. 

ठाकुरजी राधारमण लाल जू मंदिराचे स्वयंपाकघरात गेल्या 480 वर्षांपासून अखंड भट्टी जळत आहे. या अग्नीतून निघणाऱ्या ज्योतीचा वापर या मंदिरात दिवा आणि आरतीपासून ते देवाच्या नैवेद्यासाठी केला जातो. 

या मंदिराचे सेवक श्रीवत्स गोस्वामी यांच्या म्हणण्यानुसार, या मंदिर परिसरात असलेली ही प्राचीन भट्टी दिवसभर धगधगत असते. देवाची सर्व कामे पूर्ण झाल्यावर आग थंड होऊ नये म्हणून रात्री काही लाकडे त्यात टाकून वरून राख टाकली जाते. दुसऱ्या दिवशी पहाटे, त्याच आगीत थोडे शेण आणि इतर लाकूड टाकून उर्वरित भट्ट्या पेटवल्या जातात. ही प्रथा या भट्टीइतकीच जुनी आहे. ज्याबद्दल असे म्हटले जाते की ती गेल्या 480 वर्षांपासून अखंड ज्योतीच्या रूपात सतत सुरु आहे.

या पवित्र अखंड ज्योतीसारख्या ज्योतीपासून प्राप्त होणारी अग्नी दिवा आणि ज्योत प्रज्वलित करण्याबरोबरच देवाच्या आरतीमध्ये वापरली जाते. त्याच वेळी, लाइटर किंवा माचिसऐवजी, या भट्टीच्या आगीतच देवाचा नैवद्य बनवण्यासाठी केला जातो. (mathura vrindavan radharaman lal ju temple where flame is burning from past 480 years fire use for bhog) 

या स्वयंपाकघरात बाहेरील व्यक्तींना प्रवेश करण्यास सक्त मनाई आहे. या मंदिराच्या सेवकाच्या अंगावर धोतर सोडून दुसरे कपडे नसतात. स्वयंपाकघरात गेल्यावर पूर्ण प्रसाद करूनच सेवक बाहेर पडतात. बाहेर जावे लागले तरी पुन्हा आंघोळ केल्यावरच त्याला मंदिराच्या पवित्र स्वयंपाकघरात प्रवेश मिळतो. अग्नीमंथनानंतर येथे अग्नी सगळ्यातआधी प्रज्वलित करण्यात आल्याचे सांगितले, तेव्हापासून ही भट्टी अखंड सुरु आहे.