मौलवीला हवं ते मिळालं नाही, 8 महिन्यांच्या गरोदर बायकोला गच्चीवरून...

उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये एका मौलवीने आपल्या 8 महिन्यांच्या गरोदर पत्नीची हत्या केली. या हत्येचे कारण ऐकून पोलिसही चक्रावले आहेत.

Updated: May 25, 2022, 01:51 PM IST
मौलवीला हवं ते मिळालं नाही, 8 महिन्यांच्या गरोदर बायकोला गच्चीवरून... title=

लखनौ : सहारनपूर येथील कुतुबशेर पोलीस स्टेशन हद्दीत 62 फुट रोडवरील एका मशिदीच्या मौलवीने आपल्या आठ महिन्यांच्या गर्भवती पत्नीला गच्चीवरून फेकून दिले. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला असून पोलिसांनी मौलवीला अटक केली आहे. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता यातून अतिशय धक्कादायक माहिती समोर आली.

उस्मान असे या मौलवीचे नाव आहे. आपल्या गरोदर पत्नीला त्याने गच्चीवरून फेकल्यानंतर तिचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याने तिचा मृतदेह दफन केला. त्याने पत्नीच्या माहेरच्यांना ती गच्चीवरून पडल्याचे त्याने सांगितले. मात्र, तिच्या माहेरच्यांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली.

पोलिसांनी या घटनेचा तपास केला. त्या महिलेचा मृतदेह कबरीतून बाहेर काढला आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. पोस्टमॉर्टमच्या अहवालाच्या आधारे पोलिसांनी उस्मान मौलवी याची चौकशी केली.

आरोपी उस्मान याने दिलेल्या जबानीतून धक्कादायक माहिती समोर आली. आरोपीची पत्नी आठ महिन्यांची गरोदर होती. त्याने आपल्या ‘जादूटोणा’द्वारे आपल्या पत्नीच्या पोटात काय आहे हे त्याने शोधून काढले.

त्याच्या पोटात मुलगी असल्याची ‘माहिती’ त्याला मिळाली. पण, त्याला मुलगा हवा होता. यासाठी त्याने पत्नी हिना हिला अनेक वेळा गर्भपात करण्यास सांगितले. पण, तिने गर्भपात करण्यास नकार दिला. याचा राग आल्याने त्याने 12 मे रोजी पत्नीला मशिदीच्या छतावरून ढकलून दिले, अशी माहिती त्याने आपल्या जबानीत दिली.