May 2024 bank holidays List : कोणत्याही महिन्याच्या सुरुवातीला सर्वसामान्य असो किंवा पगारदगार सर्वांचीच लगबग सुरु होते ती म्हणजे बँकांना नेमक्या सुट्ट्या कधी यासंदर्भातली यादी पाहण्यासाठी. कारण एक ना अनेक कारणांनी बँकेत फेरी होते आणि ही फेरी व्यर्थ जाऊ नये असंच सर्वांना वाटत असतं. खातेधारकांची हीच सोय लक्षात घेता रिझर्व्ह बँकेकडूनही सातत्यानं BANK HOLIDAY ची यादी जाहीर करण्यात येते. दर महिन्याप्रमाणं मे महिन्यातही बँका काही दिवस बंद राहणार असून, बँक कर्मचाऱ्यांनाही उन्हाळी सुट्टीच मिळाली आहे असं म्हणणं गैर ठरणार नाही.
देशातील विविध बँकांना विविध राज्यांकडून देण्यात येणाऱ्या शासकीय सुट्ट्या आणि शनिवार- रविवारची आठवडी सुट्टी धरून साधारण 12 दिवस रजा असणार आहे. तर, काही राज्यांमधील बँका निवडणुकांमुळं बंद राहणार आहेत. विविध महापुरुषांच्या जयंती आणि अक्षय्य तृतीयेसारख्या पर्वांनिमित्तही देशातील बऱ्याच राज्यांमधील बँका बंद राहतील. आता ते दिवस नेमके कोणते आणि कोणत्या दिवसांच्या आधी तुम्ही बँकेची कामं पूर्ण करणं अपेक्षित आहे हे पाहून घ्या.
1 मे 2024 - महाराष्ट्र दिन, कामगार दिनानिमित्त महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, इंफाळ, कोची, कोलकाता, पणजी, पाटणा आणि तिरुवअनंतपूरम येथील बँकांना सुट्टी
5 मे 2024 - रविवार, देशातील सर्व बँकांची आठवडी सुट्टी
8 मे 2024 - रविंद्रनाथ टागोर जयंती, कोलकाता येथील बँका बंद
10 मे 2024 - बसव जयंती, अक्षय्य तृतीयानिमित्त बंगळुरू येथील बँका बंद
11 मे 2024 - महिन्याचा दुसरा शनिवार, देशभरातील बँकांना रजा
12 मे 2024 - रविवार असल्या कारणानं देशातील सर्व बँकांना सुट्टी
16 मे 2024 - राज्य दिनानिमित्त गंगटोक येथील बँकांना सुट्टी
19 मे 2024 - रविवार असल्या कारणानं बँकांची आठवडी सुट्टी
20 मे 2024 - लोकसभा निवडणूक, मुंबईतील बहुतांश बँकांना सुट्टी
23 मे 2024 - बुद्धपौर्णिमेनिमित्त देशातील अनेक बँका बंद
25 मे 2024 - नजरुल जयंतीनिमित्त देशातील काही राज्यांमध्ये बँकांना सुट्टी
26 मे 2024 - बँकांना रविवारची आठवडी सुट्टी