मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक तर पश्चिम रेल्वेवर नाईट ब्लॉक

उपनगरीय रेल्वे मार्गावरील ओव्हरहेड वायर,सिग्नल यंत्रणा आणि रेल्वे रुळाच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

Updated: Jan 26, 2019, 03:21 PM IST
मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक तर पश्चिम रेल्वेवर नाईट ब्लॉक  title=

मुंबई : उपनगरीय रेल्वे मार्गावरील ओव्हरहेड वायर,सिग्नल यंत्रणा आणि रेल्वे रुळाच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी मध्य रेल्वे मार्गावर रविवार मेगाब्लॉक तर पश्चिम रेल्वेवर नाईटब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर मांटुगा ते मुंलुड स्थानकांदरम्यान डाउन धिम्या मार्गावर स. ११.२० ते दु. ३.५० वाजेपर्यंत दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. ब्लॉक दरम्यान माटुंगाहून सुटणाऱ्या लोकल माटुंगा ते मुलुंड दरम्यान डाउन धीम्या मार्गावरील वाहतूक स.१०.५७ ते दु.३.५२ वाजेपर्यंत डाउन जलद मार्गावरून चालवण्यात येणार आहे. सीएसएमटीला येणाऱ्या आणि जाणाऱ्या धीम्या मार्गांवरील सर्व लोकल गाड्या स.११ ते संध्या.६ वाजेपर्यंत आपल्या निर्धारित वेळे पेक्षा १० मिनिटे उशिराने धावणार आहे. पश्चिम रेल्वेवर शनिवारी मध्यरात्री वसई रोड ते वैतराणा दरम्यान अप जलद मार्गावर रात्री ११.५० ते मध्यरात्री २.५० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे.

Image result for mega block zee news

बदलापुर-कर्जत दरम्यान स्पेशल ब्लॉक

Image result for mega block zee news

मध्य रेल्वे मार्गावरील बदलापुर ते कर्जत स्थानकांदरम्यान तांत्रिक कामासाठी रविवार २७ जानेवारी रोजी स्पेशल ब्लॉक घेण्यात येणार आहे. अप आणि डाउन दोन्ही मार्गावर सकाळी १०.३० ते दुपारी २.३० वाजेपर्यत ब्लॉक असणार आहे. ब्लॉक दरम्यान भिवपुरी आणि शेलू स्थानकात नव्या पादचारी पुलाचे गर्डर टाकण्यात येणार आहेत. त्यामुळे वाहतुकीमध्ये मोठे बदल करण्यात आलेले आहेत.ब्लॉक दरम्यान ११००९-११०१० सीएसएमटी-पुणे-सीएसएमटी सिंहगड एक्सप्रेस रद्द करण्यात आलेली आहे.

Image result for mega block zee news

१७२२२ एलटीटी-कनीकाडा एक्सप्रेस, १६३३९सीएसएमटी-नागरकोविल एक्सप्रेस आणि १७०३१ सीएसएमटी-हैद्राबाद एक्सप्रेस दिवा-पनवेल-कर्जत मार्गे चालविण्यात येणार आहेत. ११०२६ भूसावळ-पुणे एक्सप्रेस मनमाड-दौण्डमार्गे धावणार आहे. ११०४१ सीएसएमटी-चौन्नई एक्सप्रेस रविवारी २ वाजून ३०मिनिटांनी सुटणार आहे.