सहाव्या वर्षात बनली इन्स्पेक्टर ! संभाळली 'ही' जबाबदारी

महिला आणि युवतींमध्ये आत्मविश्वास वाढवण्यास सुरुवात

Updated: Oct 23, 2020, 07:30 PM IST
सहाव्या वर्षात बनली इन्स्पेक्टर ! संभाळली 'ही' जबाबदारी

बाराबांकी : मिशन शक्ती अंतर्गत आज पंतप्रधान योगी आदित्यनाथ यांनी १५३५ पोलीस स्थानकांमध्ये महिला डेस्कचे उद्घाटन केले. लखनऊला लागून असलेल्या बाराबांकीमध्ये महिला शक्ती हेल्प डेस्कच्या उद्घाटनाला ६ वर्षांची चिमुकली इन्स्पेक्टर पोहोचली. अलीना सिद्धीकी असे या छोट्या इन्स्पेक्टरचे नाव आहे. तिने फित कापून महिला शक्ती हेल्प डेस्कची सुरुवात केली. 

पोलीस इन्स्पेक्टच्या गणवेशात पोहोचलेल्या सिद्धीकीने महिला डेस्क हेल्प फतेहपूर इंचार्जचा चार्ज संभाळला. इंस्पेक्टरच्या गणवेशात अलीना खूप गोड दिसत होती. पोलीस स्थानकात पोहोचल्यानंतर तिचे फूल देऊन स्वागत करण्यात आले. खुर्चीवर बसल्यानंतर ६ वर्षाच्या मुलीने पोलीस कर्माचाऱ्यांकडून माहिती घेतली आणि त्यांना दिशानिर्देश देखील दिले. 

राज्यातील महिला आणि मुलींवरील वाढते अत्याचार आणि बलात्काराच्या घटना पाहता पोलीस स्थानक स्थरावर महिला हेल्प डेस्क सुरु करण्यात आलाय. महिला आणि युवतींच्या तक्रारींची विशेष नोंद इथे होणार आहे. 

बाराबांकीच्या फतेहपूर कोतवालीमध्ये महिला आणि युवती सशक्तीकरणाची भावना जागविण्यासाठी या हेलपडेस्कची सुरुवात करण्यात आलीय. 

याची सुरुवात करण्याची जबाबदारी ६ वर्षाच्या अलीनाकडे सोपावण्यात आली. अलीनाने देखील ती छान पद्धतीने पार पाडली. खाकीतील मानसन्मान देखील दाखवला. 

अशा प्रकारचे प्रयोग करुन पोलिसांतर्फे महिला आणि युवतींमध्ये आत्मविश्वास वाढवण्यास सुरुवात झालीय.