नवी दिल्ली : उत्तराखंडमधील एका खेड्यात आधार कार्डच्या नोंदणीमध्ये एक मोठी चूक समोर आली आहे. येथे संपूर्ण गावातील सर्व लोकांची जन्मतारीख 1 जानेवारीच दिली गेली आहे.
उत्तराखंडमधील हरिद्वारपासून 20 कि.मी. अंतरावर गेनिडी गावातील सुमारे 800 रहिवाश्यांच्या आधार कार्डवर त्यांची जन्मतारीख एक सारखीच दिली गेली आहे. नागरिकांनी दावा केला आहे की मतदार कार्ड आणि रेशनकार्ड दिल्यानंतरही आधारकार्डमध्ये ही चूक करण्यात आली आहे.
एका नागरिकांने म्हटलं की, आम्हाला एक वेगळं ओळखपत्र मिळेल असं सांगण्यात आलं होतं पण या मध्ये काय वेगळेपणा आहे. आमच्या सर्वांची जन्मतारीख देखील यावर समान देण्यात आली आहे. यानंतर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.