मुंबई : Moody's upgrades India's outlook : रेटिंग एजन्सी मूडीजने (Moody) मंगळवारी भारताच्या सॉवरेन रेटिंगला दुजोरा देताना म्हटले आहे की, देशाचा दृष्टीकोन नकारात्मकवरून स्थिर झाला आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था आणि आर्थिक व्यवस्थेत सुधार होणार असल्याचे नमूद केले. मूडीजने भारताला 'Baa3' सॉवरेन रेटिंग (sovereign rating) दिले आहे, जे जंक ग्रेडपेक्षा फक्त एक पाऊल पुढे आहे. त्यामुळे जीडीपीचे रेटिंग सुधारण्यास मदत झाली आहे.
जागतिक रेटिंग एजन्सी मूडीजने एका निवेदनात म्हटले आहे की, "मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसने (Moody's Investors Service) आज भारत सरकारच्या रेटिंगसाठी नकारात्मक दृष्टिकोनातून बदल केला आहे आणि देशाचे परकीय चलन, स्थानिक चलन दीर्घकालीन जारीकर्ता रेटिंग आणि स्थानिक चलन रेटिंग अपडेट केले आहे. वरिष्ठ 'Baa3' असुरक्षित रेटिंग दिले आहेत.
ग्लोबल रेटिंग एजन्सी मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसच्या (Moodys) अहवालात भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल सकारात्मक बदल असल्याचे म्हटले आहे. मूडीजच्या या अहवालात भारत 'निगेटीव्ह' मधून रेटिंगच्या 'स्टेबल' श्रेणीमध्ये आला आहे, असे म्हटले आहे. त्यामुळे कोरोना काळात बिकट झालेल्या भारताच्या अर्थव्यवस्थेत काही प्रमाणात सुधारणा झाल्याचे दिसून आले आहे.
Moody's Investors Service (Moody's) changes India's rating outlook to 'stable' from 'negative'
Moody's affirmed country's foreign-currency&local-currency long-term issuer ratings & the local-currency senior unsecured rating at Baa3 &other short-term local currency rating at P-3.
— ANI (@ANI) October 5, 2021
मूडीजने (Moodys) आपल्या अहवालात म्हटले की, भारतातील बाजारात भांडवलाची उपलब्धता आणि व्यवहारात तरलता चांगली आहे. त्यामुळेच बँक, बिगर-बँकिंग वित्तीय संस्थांची वित्तीय जोखीम कमी झाली आहे. त्यामुळे आता भारताच्या अर्थव्यवस्थेला चांगली गती मिळणार असल्याचे संकेत दिले आहे. मूडीजने आधीच्या अहवालातील रेटिंगपेक्षा यावेळी चांगले रेटिंग दिले आहे.
देशातील प्रमुख क्रेडिट स्ट्रेंथ रेटिंग Baa3 स्तरावर ठेवत मूडीजने (Moodys) भारताच्या अर्थव्यवस्थेत बदल होत आहेत. हा एक चांगला दृष्टिकोन आहे. यामुळे वैविध्यपूर्ण अर्थव्यवस्था असलेला देश म्हणून भारताला ओळखले जाणार आहे. ज्या अर्थव्यवस्थेत उच्च वाढीची क्षमता आणि सरकारी कर्जासाठी स्थिर स्थानिक वित्तपुरवठा आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत सध्या काही धोके आहेत, असे देखील मूडीजने म्हटले आहे. दरम्यान, कर्जाचे ओझे अजूनही कायम आहे. असे असले तरी भारताची आर्थिक स्थिती सरकारला येत्या काही वर्षांत सामान्य वित्तीय तोट्यातून सावरण्याची संधी मिळेल अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.