Emotional moment for mother father and daughter: ज्या घरात मुलगी असते ते कुटुंब भाग्यशाली असतं, आपल्या आसपासच्या बहुतेकांचं हेच मानणं असेल? घरातील मुली हजारो पद्धतीने कुटुंबाची शोभा वाढवतात. याच विचारला अधोरेखित करणारा एक व्हिडीओ सध्या शोधलं मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे. आयएस अधिकारी संजय कुमार यांनी हा खास व्हिडीओ शेअर केला आहे.
आपल्या मुलीच्या पाठवणीआधी या माता पित्याने जे केलं ते त्या मुलीसाठी स्पेशल होतंच. मात्र ज्यांनी हा व्हिडीओ पहिला त्यांनी याबाबत संमिश्र अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.
मुलीच्या पाठवणीआधी या माता पित्याने मुलीच्या पायांचे ठसे घेतलेत आणि तिची ही गोड आठवण घरात ठेवली आहे. जाणून घेऊयात याच व्हायरल व्हिडिओबाबत.
व्हायरल व्हिडीओ IAS अधिकारी संजय कुमार यांनी शेअर केला आहे. 2 मिनिटं 20 सेकंदांच्या या क्लिपमध्ये एक बाप एका मोठ्या थाळीत आपल्या मुलीचे पाण्याने पाय धुताना पाहायला मिळतात. पाण्यानंतर त्यांनी मुलीचे दुधाने पाय धुतले. महत्त्वाची बाब म्हणजे या माता पित्याने मुलीचे ज्या दूधाने पाय धुतले, ते पाणी पिताना दोघेही पाहायला मिळतात. यानंतर या व्हिडिओतील महिला मुलीला लाल रंग असलेल्या थाळीत पाय ठेवायला सांगते.
भावुक पल..
विदाई से पूर्व बेटी के पद-चिन्हों को घर में संजोकर रखते मां-बाप..#HeartTouching
VC : SM pic.twitter.com/kJdF8dj4e6— Sanjay Kumar, Dy. Collector (@dc_sanjay_jas) August 22, 2022
या व्हिडिओमध्ये ती मुलगी सफेद रंगाच्या कपड्यावरून चालताना पहायला मिळते. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये 'अतिशय भावुक क्षण' असं लिहिलं गेलं आहे.
हा व्हिडीओ ऑनलाईन शेअर झाल्यानंतर तब्बल एक लाखांपेक्षा अधिकवेळा पहिला गेलाय. या व्हिडिओवर कमेंट्सचा पाऊस पडतोय. या व्हिडिओवर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी या आई वडिलांचं समर्थन केलं आहे तर अनेक जणांना ही कृती आवडलेली नाही.
तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटतंय? कमेंटमध्ये लिहा.
या व्हिडिओच्या सत्य असत्यतेबाबत zee 24 taas कोणतीही पुष्टी करत नाही.
mother and father washes feet of daughter with milk and then drink that mik video goes viral