Mother's Day 2023 च्या निमित्तानं ब्रेकफास्टपासून डिनरपर्यंत, आईसाठी बनवा चवीष्ट, सोप्या रेसिपी

Mothers Day 2023 Recipes: आईला सरप्राईज द्यायचंय? एक काम करा, यंदाच्या मदर्स डेचं औचित्य साधत थेट आईसाठीच एका मेजवानीचा बेत आखा आणि तिची रिअॅक्शन व्हिडीओ किंवा फोटोच्या रुपात कायम जपून ठेवा... 

सायली पाटील | Updated: May 14, 2023, 09:25 AM IST
Mother's Day 2023 च्या निमित्तानं ब्रेकफास्टपासून डिनरपर्यंत, आईसाठी बनवा चवीष्ट, सोप्या रेसिपी  title=
Mothers Day 2023 Recipes Best Dinner lunch Receipes for your mom on mothers day in marathi

Mother's Day 2023 in Marathi: 'आईच्या हातचं मला अमुक आवडतं', ती 'हा' पदार्थ जगात भारी बनवते. तमुक पदार्थ बनवण्यात माझ्या आईचा हात कोणीच धरू शकत नाही. असं आपण सर्वजण कायमच म्हणत असतो. पण, कधी आईला तुमच्या हातचं काय आवडतं हे तिला विचारलंय? किंबहुना तिला कधी तुम्ही काही बनवून खायला घातलंय? असं नसेल केलं, तर ही संधी सोडू नका. 'मदर्स डे'च्या निमित्तानं आईसाठी एखादा छानसा पदार्थ बनवा आणि तिला या स्वयंपाकातून, रोजच्या कामातून काहीशी उसंत द्या. 

14 मे 2023 ला यंदाच्या वर्षी मदर्स डे साजरा केला जात आहे. या दिवशी आईला सरप्राईज द्याच्या बेतात असाल, तर तिला स्वयंपाकघरातून सुट्टी द्या. हा उत्तम पर्याय असेल. (Mothers Day 2023 Recipes Best Dinner lunch Receipes for your mom on mothers day in marathi)

आईसोबत मस्त गप्पा मारत तुम्ही ब्रेकफास्ट करु शकता. अगदी भल्या पहाटेच नव्हे, तर सकाळी साधारण 9- 10 च्या सुमारास तुम्ही आईसाठी मस्त असा ब्रेकफास्ट बनवू शकता. यामध्ये तुम्ही रोजच्या उपमा- पोह्यांना दूर लोटत इंग्लिश ब्रेकफास्ट, ब्रुशेता अशा पदार्थांना पसंदी देऊ शकता. हे पदार्थ ऐकायला आणि उच्चारायला कठीण वाटत असले तरीही बनवायला सोपे आहेत. सोबतीला मस्तपैकी कॉफी, कोल्ड कॉफीची जोड तुम्ही देऊ शकता. 

छानपैकी heavy breakfast केल्यानंतर हा तुमचा ब्रंचच असेल. त्यामुळं दुपारच्या वेळी काहीतरी हलकंफुलकं खाऊन आईला आऊटिंगसाठी बाहेर न्या, जवळ कुठे सुर्यास्त पाहण्यासाठीचं ठिकाण असेल तर तिथे जा. किंवा मग घरीच चित्रपट किंवा सीरिज पाहताना त्याचं बिंज वॉच करा. भर उन्हात बाहेर जाण्यापेक्षा हा सर्वात उत्तम पर्याय ठरेल. 

आईसोबतची डिनर डेट...

आता राहिला प्रश्न राहिला डिनरचा, तर डिनरही खासच हवा नाहीका. आईसाठी तुम्ही नेहमीच्या घरगुती जेवणापेक्षा काहीसा हटके मेन्यू ठेवा. यामध्ये एखादं सूप, स्टार्टर, मेनकोर्स आणि डेझर्ट बनवण्यासाठी जास्त वेळ न घालवता छानसा केक अशी आखणी करू शकता. सूपमध्ये तुम्ही क्लिअर सूप, किंवा एखादं फिश सूप हे पर्याय निवडू शकता. युट्यूबवर याच्या व्हिडीओ अगदी सहजपणे उपलब्ध असतील. 

हेसुद्धा वाचा : Mother's Day 2023: मदर्स डे कधी आहे? का साजरा केला जातो हा दिवस, जाणून घ्या इतिहास

 

स्टार्टरचं म्हणाल, तर इथे तुम्ही चीझ गार्लिक ब्रेड, फिश केक किंवा फ्लॅट ब्रेड- चीझ अशा पदार्थांना प्राधान्य द्या. स्टार्टर्स तुलनेनं हलकेफुलकेच ठेवा. जेणेकरून मेन कोर्समध्ये काहीतरी खास करता येईल. मेस कोर्ससाठी तुम्ही चिकन इन क्रिमी सॉस, व्हाईट सॉस स्पगेती, ग्रिल्ड चिकन विथ सॅलड असा बेत आखू शकता. किमान साहित्यात पटापट तयार होणाऱ्या या रेसिपी बनवता बनवताही तुम्ही आईशी गप्पा मारू शकता. थोडक्यात हासुद्धा तुमच्यासाठी क्वालिटी टाईमच असेल. 

जेवण बनवून मस्तपैकी आईचं ताट सजवा, तिच्यासोबत जेवायला बसा. सोबत टीव्ही वगैरे लावण्यापेक्षा तिच्या आवडीची गाणी लावा आणि दिवे मंद ठेवून त्या सुरेख क्षणाचा आनंद घ्या. कारण, आई खास आहे.... तिला जपायला हवं!