Share Price: इतिहास रचला! पहिल्यांदाच एका शेअरची किंमत 100000 रुपये; तुमच्याकडे आहे का?

MRF hit Rs 1 lakh per share mark:  एमआरएफने एक लाख प्रति शेअरची किंमत गाठणारा भारतातील पहिला शेअर (BSE benchmark Sensex) ठरला आहे.

Updated: Jun 13, 2023, 02:48 PM IST
Share Price: इतिहास रचला! पहिल्यांदाच एका शेअरची किंमत 100000 रुपये; तुमच्याकडे आहे का?  title=
MRF share price 1 lakh per share

MRF Share Price: मागील चार महिन्यांपासून शेअर बाजारात (Share Market) मोठा चढ-उतार पहायला मिळत होता. त्यामुळे गुंतवणूकदार चिंतेत असल्याचं दिसत आहे. मागील वर्षापासून परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय मार्केटमधून काढता पाय घेतला होता. मात्र, आता मार्केट पुन्हा स्टेबल होत असल्याचं दिसतंय. अशातच शेअर मार्केटमध्ये मंगळवारी इतिहास घडला आहे. एका शेअरच्या (MRF Share Price) किंमतीने लाखाची किंमत पार केली. 

सर्वात मोठ्या टायर कंपनीपैकी एक MRF शेअरने मंगळवारी नवीन विक्रम स्थापित केलाय. सर्वात मोठा शेअर (Biggest Stock In Indian Share Market) अशी ओळख असलेल्या एमआरएफने एक लाख प्रति शेअरची किंमत गाठणारा भारतातील पहिला शेअर (BSE benchmark Sensex) ठरला आहे. बीएसईवर काल हा शेअर 98,9390 वर होता. मात्र, बाजार उघडताच MRF चा शेअर 99,500 वर उघडला. त्यानंतर लवकर शेअर 1 लाख रुपयाचा (Rs 1 lakh per share) टप्पा पार करेल, अशी आशा होती. बाजाराच्या पहिल्या तासाभरातच MRF ने ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

आणखी वाचा - Stocks to buy: 'या' मल्टिबॅगर स्टॉकनं दिला 5 वर्षात 200 टक्के परतावा... जाणून घ्या या स्टॉकबद्दल!

सकाळच्या व्यापारात बीएससीवर (BSE) शेअरची किंमत 1,00,300 रुपयांवर गेली. गेल्या एका वर्षात हा शेअर 45 टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांची चांदी झाल्याचं दिसून आलंय. 1993 साली बाजारात आलेल्या या कंपनीने आज लाखाचा टप्पा पार केलाय. मात्र, 30 वर्षापूर्वी या शेअरची किेंमत फक्त 11 रुपये होती. आज 41,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त मार्केट कॅपिटल असलेला ही कंपनी एकेकाळी फुगे बनवण्याचं काम करत होती. आज ही कंपनी देशातील सर्वात मोठी टायर बनवणारी कंपनी आहे.

MRF चा शेअर सर्वात महागडा का?

दरम्यान, केएमएम मप्पिलई यांनी या कंपनीची सुरूवात केली होती. MRF ने आतापर्यंत कधीही आपला स्टॉक स्प्लिट केला नाही, त्यामुळे हा शेअर बाजारातील सर्वात महागडा शेअर आहे. कंपनीची 72.16 टक्के म्हणजेच 30,60,312 शेअरची हिस्सेदारी सार्वजनिक भागधारकांकडे आहे. एकीकडे मार्केट डाऊन असताना गेल्या तीन वर्षात या शेअरची किंमत तब्बल 20 टक्क्यांनी वाढली आहे.