मुंबई : Multibagger stock : मागील वर्षाप्रमाणे या वर्षीदेखील अनेक स्टॉक गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरले आहे. यामध्ये Rama Phosphates या स्टॉकने आश्चर्यकारक परतावा दिला. या स्टॉकने गुंतवणूकदारांच्या 1 लाखाचे 1.81 कोटी केले आहेत.
Rama Phosphates हा एक उत्तम फंडामेंटल असलेला स्टॉक आहे.
मागील महिन्यादरम्यान, या स्टॉकला देखील घसरणीचा सामना करावा लागला होता. रामा फॉस्फेट एकावेळी 400 रुपयांच्या दरम्यान ट्रेड करीत होता. होता. परंतू सध्या हा स्टॉक घसरणीसह 360 रुपयांच्या आसपास पोहचला आहे.
एका महिन्याच्या अवधीत हा स्टॉक साधारण 10 टक्क्यांनी घसरला आहे. परंतू या स्टॉकच्या परफॉमन्सवर नजर टाकल्यास 2021मध्ये हा स्टॉक 235 टक्क्यांनी वधारला आहे.
रामा फॉस्फेट या शेअरने लॉंग टर्म गुंतवणूकदारांना दमदार रिटर्न्स दिले आहेत. मागील 6 महिन्यात शेअरने 8 टक्क्यांची तेजी नोंदवली आहे. परंतू मागील एका वर्षात 108 वरून 235 रुपयांनी वधारून 360 रुपयांवर ट्रेड करीत आहे.
या स्टॉकसाठी 2021 वर्ष उत्तम ठरले आहे. मागील 5 वर्षात शेअर 76 रुपयांवरून 400 रुपयांपर्यंत पोहचला आहे.
10 वर्षात हा स्टॉक 51 रुपयांवरून 360 रुपयांवर पोहचला आहे. म्हणजेच शेअरने 610 टक्के तेजी नोंदवली आहे. तसेच आजपासून 19 वर्षापूवी 13 मार्च 2003 ला हा स्टॉक फक्त 2 रुपयांत मिळत होता.
म्हणजेच एखाद्या गुंतवणूकदाराने 19 वर्षापूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर, त्याचा पोर्टफोलिओ 1.81 कोटी इतका झाला असता.