multibagger stock | 2 रुपयांहून कमी किंमतीचा शेअर पोहचला 300 वर; 1 लाखाचे झाले 2 कोटी

शेअर बाजारात सध्या जबरदस्त तेजीचे वातावरण आहे. या दिवसांमध्ये लार्ज कॅप पासून ते स्मॉल कॅप शेअर्सपर्यंत सर्वच चांगला परफॉरमन्स देत आहेत. 

Updated: Oct 16, 2021, 01:43 PM IST
multibagger stock | 2 रुपयांहून कमी किंमतीचा शेअर पोहचला 300 वर; 1 लाखाचे झाले 2 कोटी  title=

मुंबई : शेअर बाजारात सध्या जबरदस्त तेजीचे वातावरण आहे. या दिवसांमध्ये लार्ज कॅप पासून ते स्मॉल कॅप शेअर्सपर्यंत सर्वच चांगला परफॉरमन्स देत आहेत. काही दिवसांपूर्वीच सेसेक्सने 61 हजारांचा टप्पादेखील पार केला आहे. येत्या काळात सेंसेक्स 65 हजारांचा टप्पा गाठेल अशी शक्यता आहे. यामध्ये एका मल्टीबॅगर शेअरने गुंतवणूकदरांना अक्षरशः मालामाल केले आहे. तो म्हणजे रामा फॉस्फेट होय.

दिग्गज गुंतवणूकदार डॉली खन्ना नेहमीच मिडकॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये गुंतवणूक करीत असतात. त्यांनी जूनपासून आपल्या पोर्टफोलिओमध्ये 7 नवीन स्टॉक ऍड केले आहेत. त्यामधील एक आहे रामा फॉस्फेट होय.

14 टक्क्यांची तेजी
रामा फॉस्फेट फर्टिलायझर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये शेअरचा भाव 265 रुपयांनी वाढून 301 रुपयांवर पोहचला. दुसऱ्या तिमाहीमध्ये शेअर साधारण 14 टक्क्यांनी वाढला आहे. 

20 वर्षापूर्वी शेअरची किंमत
रामा फॉस्फेटच्या 20 वर्षांपूर्वी म्हणजेच सप्टेंबर 2001मध्ये शेअरची प्राइज 1.55 रुपये होती. 20 वर्षात या शेअरने दिलेल्या रिटर्नमुळे शेअर मल्टीबॅगर ठरला आहे. म्हणजेच शेअरने 20 वर्षात 20,000 टक्के रिटर्न दिला आहे.

एखाद्या गुंतवणूकदारांने 20 वर्षापूर्वी 1.55 प्रति शेअरच्या हिशोबाने 1 लाख रुपये गुंतवले असतील तर, आज 1 लाखाचे 1.97 कोटी रुपये झाले असतील.