एमएमसी कायद्यानुसार कारवाई झालीय, महापौरांचे स्पष्टीकरण

महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishore Pedekar) यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय. 

Updated: Nov 28, 2020, 06:20 AM IST
एमएमसी कायद्यानुसार कारवाई झालीय, महापौरांचे स्पष्टीकरण  title=

मुंबई : अभिनेत्री कंगना राणौतच्या (Kangana Ranaut) घर, कार्यालयावर केलेल्या कारवाई प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) पालिकेला फटकारलंय. यावर आता महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishore Pedekar) यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय. जी कारवाई झाली ती एमएमसी कायद्यानुसार (MMC Act) झालीय. अनधिकृत बांधकाम (Illegal Construction) सुरू असताना ३५४ अ अंतर्गत २४ तास अगोदर नोटीस दिली होती असे त्या 'झी २४ तास'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या. 

कारवाई सुडापोटी केली असेल तर मग त्या नटीनं पीओके म्हणून जो अपमान मुंबईचा केला, त्यावर कुठल्या कोर्टात दाद मागायची ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 

एमएमसी कायद्यानुसार कारवाई करा असं कोर्टानं यापूर्वी अनेकदा सांगितलं आहे. मग कंगना प्रकरणात काय उणिवा राहिल्या ? त्या पाहू, असे त्या म्हणाल्या. कोर्टाच्या निर्णयावर बोलणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलं.

कंगनालाच ही नोटीस पहील्यांदा दिलीय, असं नाही. अशा अनेक नोटीसा पूर्वी दिल्या गेल्या आहेत. मग आताच असं काय झालं ? या निर्णयाचा परिणाम संपूर्ण मुंबईतील अनधिकृत बांधकामांसंदर्भात होईल असे किशोरी पे़डणेकर म्हणाल्या. 

याउलट महाराष्ट्रावर सूड उगवला जातोय. ज्यांचा महाराष्ट्राशी काही संबंध नाही ते ओकाऱ्या टाकून जातायत. यामुळं मुंबईकर संभ्रमात आहेत. परंतु त्यांना काय चाललंय ते चांगलं कळतंय असेही महापौर म्हणाल्या.