Mysterious Fort : देशातील 'या' किल्ल्यात दडलाय कोट्यवधींचा खजिना, आजपर्यंत कोणाला सापडला नाही!

या किल्ल्यामध्ये कोट्यवधी रुपयांचा खजिना दडलेला आहे, परंतु आजपर्यंत तो कोणालाही सापडलेला नाही.

Updated: Aug 7, 2022, 12:01 PM IST
Mysterious Fort : देशातील 'या' किल्ल्यात दडलाय कोट्यवधींचा खजिना, आजपर्यंत कोणाला सापडला नाही! title=

मुंबई : आजही आपल्या देशात शेकडो किल्ले आहेत. त्यापैकी बहुतांश किल्ल्यांची आता पडझड झाली आहे. परंतु काही किल्ले आजही सुस्थितीत उभे आहेत. यापैकी काही किल्ले आश्चर्यकारक आणि रहस्यांनी भरलेले आहेत. ज्याचे रहस्य आजपर्यंत कोणालाही कळू शकलेलं नाही. 

आज आम्ही तुम्हाला हिमाचल प्रदेशमध्ये असलेल्या अशाच एका किल्ल्याबद्दल सांगणार आहोत. या किल्ल्याबद्दल असं म्हटलं जातं की, आजही या किल्ल्यामध्ये कोट्यवधी रुपयांचा खजिना दडलेला आहे, परंतु आजपर्यंत तो कोणालाही सापडलेला नाही.

हमीरपुर जिल्ह्यातील सुनापुर किल्ला

खरं तर, आम्ही हिमाचल प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात असलेल्या सुजानपूरच्या किल्ल्याबद्दल बोलत आहोत. या ठिकाणी लपलेल्या खजिन्यामुळे याला हमीरपूरचा 'खजिनदार किल्ला' असंही म्हणतात. हा किल्ला कटोच घराण्याचं राजा अभय चंद यांनी 264 वर्षांपूर्वी म्हणजेच 1758 मध्ये बांधला होता. त्यानंतर याठिकाणी राजा संसारचंद राज्य करत होते.

किल्ल्यात खजिना असल्याचा दावा

आजही राजा संसारचंद यांचा खजिना या किल्ल्यात असल्याचा दावा केला जातो. मात्र अजूनपर्यंत या खजिन्याच्या रहस्यावरुन ना पडदा उठला किंवा कोणी खजिन्यापर्यंत पोहोचलंय. किल्ल्याच्या आतच पाच किलोमीटर लांबीचा बोगदा असल्याचं मानलं जातं, परंतु आजपर्यंत या बोगद्याच्या टोकापर्यंत कोणीही पोहोचलेलं नाही. अरुंद आणि अंधाऱ्या वाटेमुळे या बोगद्यातून 100 मीटरपेक्षा जास्त जाण्याचा विचारही कोणी करत नाही.

रात्री येतात विचित्र आवाज

रात्री किल्ल्यावरून विचित्र आवाज येत असल्याचे गडाच्या आजूबाजूला राहणारे ग्रामस्थ सांगतात. त्यांचा असा विश्वास आहे की किल्ल्यात उपस्थित असलेल्या शक्तींद्वारे खजिना संरक्षित केला जातो. मात्र, याचा ठोस पुरावा कोणाकडेच नाही. राजा संसारचंदने लुटलेला खजिना लपवण्यासाठी या किल्ल्याचा वापर केल्याचं म्हटलं जातं. त्यासाठी त्यांनी किल्ल्यात एक गुप्त बोगदा बांधला होता, ज्याचा मार्ग थेट तिजोरीपर्यंत खुला होतो.