दूध प्यायल्याने सापाचा होऊ शकतो मृत्यू... तुम्ही देखील असे करत असाल, तर आधी या मागचं सत्य जाणून घ्या.

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, साप दूध प्यायल्याने मरू शकतो. होय, तुम्ही हे अगदी बरोबर वाचले.

Updated: Aug 13, 2021, 03:35 PM IST
दूध प्यायल्याने सापाचा होऊ शकतो मृत्यू... तुम्ही देखील असे करत असाल, तर आधी या मागचं सत्य जाणून घ्या. title=

मुंबई : आपल्या देशातील काही परंपरा अनेक शतकांपासून सुरू आहेत. भारतात वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक रहातात. त्यामुळे भारतातील वेगवेगळ्या भागात लोकं आपआपल्या परंपरेप्रमाणे सण साजरे करतात. यामध्ये एक परंपरा आहे, ज्यात लोक सापांना दूध पाजतात. परंतु सापाला खाऊ घालणे किती योग्य आणि अयोग्य आहे, हे फार कमी लोकांना माहित आहे. अपुऱ्या ज्ञानामुळे आपण सापाला दूध देणे हे पुण्याचे काम मानतो, परंतु तसे अजिबात नाही.

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, साप दूध प्यायल्याने मरू शकतो. होय, तुम्ही हे अगदी बरोबर वाचले आहे.  दूध प्यायल्याने सापाचा जीव जाऊ शकतो. त्यामागे वैज्ञानिक कारण आहे. आज आम्ही तुम्हाला यासंबंधित माहिती देणार आहोत.

साप रेंगळणाऱ्या प्राण्यांमध्ये येतात, जे पूर्णपणे मांसाहारी असतात. साप हे बेडूक, उंदीर, पक्षी, सरडे, इतर लहान साप वगैरे खातात. साप दूध पितो हे पूर्णपणे चुकीचे आहे. ही एक चुकीची परंपरा आहे, जी आपण वर्षानुवर्षे मानत आलो आहोत.

तर सत्य हे आहे की, साप ना दूध पितो ना त्यांना प्यायला आवडते. वास्तविक, या चुकीच्या परंपरेमागे सर्पप्रेमींचा हात आहे. आपले कुटुंब चालवण्यासाठी सापांवर अवलंबून असणारे सर्पप्रेमी या परंपरेमुळे जागोजागी फिरतात आणि पैसे आणि धान्य मिळवतात.

मीडिया रिपोर्टनुसार, नाग पंचमीपूर्वी, सर्पप्रेमी जंगलातून साप पकडतात आणि त्यांचे दात काढतात, तसेच त्यांची विष ग्रंथी देखील काढून टाकतात, जेणेकरून त्यांच्या हल्ल्यामुळे कोणत्याही व्यक्तीला धोका होऊ नये.

दूध प्यायल्याने सापांचा मृत्यू होऊ शकतो

दात तोडल्यामुळे सापाला तोंडात जखम होते. एवढेच नाही तर सर्पप्रेमी जंगलातून आणलेल्या सापांना अनेक दिवस भुकेले आणि तहानलेले ठेवतात जेणेकरून नागपंचमीच्या दिवशी भुकेने ग्रस्त असल्याने ते काहीही खातात आणि पितात.

अनेक दिवस भुकेले आणि तहानलेल्या सापाला जेव्हा हे सर्पप्रेमी नाग पंचमीच्या दिवशी इतर लोकांकडे घेऊन जाता. तेव्हा ते पाणी म्हणून दूध पितात. दात तुटलेले असल्यामुळे आणि त्यात तोंडात जखम असल्यामुळे दूध प्यायल्याने ही जखम आणखी वाढते.

एवढेच नाही तर दूध पिल्याने सापाचे फुफ्फुसे आणि आतडेही खराब होतात आणि नंतर काही दिवसांनी त्यांचा मृत्यू होतो. म्हणूनच सापांना कधीही दूध पाजू नका.