मुंबई : बाजारात दमदार तेजी दिसून येत आहे. निफ्टी 50 ने बाजार उघडताच नवा रेकॉर्ड बनवला आहे. प्रथमच निफ्टी 16800 अंकांपर्यंत पोहचले आहे. ग्लोबल बाजारांमध्ये आलेल्या तेजीचा फायदा भारतीय स्टॉक मार्केटलाही झाला आहे. यामुळे आमच्या पॅनल एक्सपर्टने निफ्टीमध्ये स्वस्त कॉल ऑप्शन ट्रेड करण्याचा सल्ला दिला आहे. यामध्ये मार्जिन आणि रिस्क ब्रोकरेज कमी असेल. त्यामुळे तुमची बंपर कमाई होऊ शकेल.
कॅशचे ऑप्शन
एक्सपर्टच्या मते, आज कॉल ऑप्शन खरेदी करण्याची चांगली संधी आहे. 16750 चा कॉल ऑप्शन खरेदी करायचा आहे. सध्या तो 114 च्या आसपास ट्रेड करीत असून यासाठी 62 रुपयांचा स्टॉपलॉस लावायचा आहे. 2 सप्टेंबरच्या एक्सपायरी कॉन्ट्र्क्ट निवडायचा आहे. एक्सपर्टच्या मते 17000 च्या लेवलला निफ्टी टच करण्याची दाट शक्यता आहे.
बाजारात दमदार खरेदी
मजबूत ग्लोबल संकेतांमुळे भारतीय शेअर बाजारांमध्ये दमदार तेजी दिसून येत आहे. सोमवारी बाजाराने सर्व जुने रेकॉर्ड तोडले. निफ्टी प्रथमच 16800च्या पुढे गेले. सेंसेक्समध्येदेखील 300 अंकांची तेजी दिसून आली. बँक, फायनांशियल, मेटल आणि ऑटो शेअर्समध्ये जास्त खरेदी दिसून येत आहे.