एनडीए सरकारविरोधात आज संसदेत अविश्वास ठराव येण्याची शक्यता

केंद्र सरकारविरोधात आज संसदेत अविश्वास ठराव येण्याची शक्यता आहे....  तेलुगू देसम पक्ष आणि वायएसआर काँग्रेसनं सरकारविरोधात अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिलीय. 

Updated: Mar 19, 2018, 10:53 AM IST
एनडीए सरकारविरोधात आज संसदेत अविश्वास ठराव येण्याची शक्यता title=

नवी दिल्ली : केंद्र सरकारविरोधात आज संसदेत अविश्वास ठराव येण्याची शक्यता आहे....  तेलुगू देसम पक्ष आणि वायएसआर काँग्रेसनं सरकारविरोधात अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिलीय. 

या प्रस्तावाला काँग्रेससह द्रमुक, तृणमूल काँग्रेस, सपाव्यतिरिक्त डाव्या पक्षांनीही या प्रस्तावाला पाठिंबा दिलाय.... मात्र केंद्र सरकारविरोधातल्या अविश्वास ठरावाला शिवसेना पाठिंबा देणार नाही, असं शिवसेनेनं याआधीच स्पष्ट केलंय. 

अविश्वास प्रस्ताव आणण्यासाठी पन्नास खासदारांचं समर्थन लागतं. पण सध्या एनडीए सरकारकडे बहुमत असल्यानं सरकारला कुठलाही धोका नाही..