आता एटीएम कार्ड न वापरता पैसे काढा

एटीएमचा वापर न करताही पैसे काढता आले तर ? हो. हे शक्य आहे.

Updated: Nov 11, 2017, 07:56 PM IST
आता एटीएम कार्ड न वापरता पैसे काढा title=

मुंबई : एटीएमचा वापर करुन आपण हवे तेव्हा पैसे काढू शकतो ही सर्वसाधारण बाब आहे. पण एटीएमचा वापर न करताही पैसे काढता आले तर ? हो. हे शक्य आहे.

कारण आता एटीएमऐवजी थम्ब चा वापर करुन पैसे काढता येणार आहेत. स्टेट बॅक ऑफ इंडियाच्या जवळजवळ सर्वच एटीएममध्ये ही प्रणाली येण्याची शक्यता आहे.

एटीएम पीन कार्डचा गैरवापर करून पैसे लुटण्याचा खेळ सर्रासपणे सुरू असतो. याला आळा घालण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जातात. पण बऱ्याचदा चोर सापडणे कठीण होऊन जाते. यासाठी स्टेट बॅक ऑफ इंडियातर्फे उपाययोजना आखल्या जात आहेत.

याचाच एक भाग म्हणून एटीएममध्ये थम्ब पद्धत लागू करण्यात येणार आहे. 
 
ग्राहकांच्या पैशांची सुरक्षितता लक्षात घेता येणाऱ्या दिवसात एटीएममध्ये थम्ब इम्प्रेशन सिस्टीम कार्यान्वित करण्याचा विचार सुरू असल्याचे क्षेत्रीय व्यवसाय कार्यालयचे मुख्य प्रबंधक अश्विन चौधरी यांनी सांगितले. 

बायोमेट्रीक पद्धत

हल्ली सगळ्या कंपन्यामध्ये हजेरीसाठी बायोमेट्रीक पद्धत अवलंबली जाते. कर्मचारी त्यामुळे हजेरीत गैरप्रकारांनाही आळा बसण्यास मदत होते. हीच बायोमेट्रीक पद्धत आता एटीएममध्येही अवलंबली जाणार आहे. 

काय होणार फायदे ?

एटीएममधून पैसे काढण्यासाठी थम्ब पद्धतीचा वापर केल्यास एटीएम कार्ड जपून बाळगण्याची गरज भासणार नाही. 
एटीएमचा पासवर्ड लक्षात ठेवावा लागणार नाही.
एटीएम कार्ड चोरीला गेल्यास चिंता नाही.
प्रत्येकाचे फिंगरप्रिंट वेगळे असल्याने दुसऱ्याचे पैसे काढता येणार नाही.