Trending Video : दोन नर्सेसने तरुणांना केली बेदम मारहाण, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

Bihar Hospital News : हे दोन तरुण वैद्यकीय प्रमाणपत्रे घेण्यासाठी रुग्णालयात गेले होते तेव्हा ही धक्कादायक घटना घडली आहे. जेव्हा हे तरुण रुग्णालयात प्रमाणपत्रे घेण्यासाठी गेले होते तेव्हा...

Updated: Oct 23, 2022, 01:27 PM IST
Trending Video :  दोन नर्सेसने तरुणांना केली बेदम मारहाण, जाणून घ्या काय आहे प्रकरण? title=
Nurse Beats Men Shocking Video Viral on Social media nmp

Nurse Beats Men Viral Video : रुग्णालय  (Hospital) म्हटलं की आपल्या अंगावर काटा येतो. आजारपण कोणालाही नको असतं. रुग्णालयात भरती झाल्यावर नर्सेस आपली देखरेख करतात. पण सध्या सोशल मीडियावर दोन नर्सेसचा (Nurses) व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होतो. या नर्सेसने जे काही केलं आहे की ते पाहून नेटकरी संतापले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. या दोन नर्सेसचं प्रताप पाहून सर्वत्र रोष व्यक्त होतो आहे. 

धक्कादायक व्हिडीओ (Shocking video)

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता दोन तरुणांना (two boys) ओलीस ठेवण्यात आल्याचं दिसतंय. या तरुणांसोबत दोन नर्सेस दिसतं आहेत. एका नर्सेसच्या हातात लाकडाची काठी आहे. या धक्कादायक व्हिडीओमध्ये या दोन नर्सेस तरुणांना मारताना दिसतं आहेत. संतप्त परिचारिका तरुणांना मोबाईल डिव्हाइसमधील रेकॉर्डिंग हटवण्याची धमकी देत आहेत.   (Nurse Beats Men Shocking Video Viral on Social media nmp)

कुठली आहे ही घटना? 

ही संतप्तजनक घटना बिहारच्या (Bihar) छपरा रुग्णालयातील (Chapra hospital) आहे.  हे दोन तरुण वैद्यकीय प्रमाणपत्रे घेण्यासाठी रुग्णालयात गेले होते तेव्हा ही धक्कादायक घटना घडली आहे. जेव्हा हे तरुण रुग्णालयात प्रमाणपत्रे घेण्यासाठी गेले होते तेव्हा त्यांना रुग्णालयाची खराब परिस्थिती (recording poor condition of Hospital) दिसली. म्हणून त्यांनी रुग्णालयाची परिस्थिती कॅमेऱ्यात कैद केली.  ही घटना नर्सेसला कळताच त्यांनी या दोन तरुणांना ओलीस ठेवलं आणि त्यांना मारहाण केली. 

'अशी कुठलीही घटना घडली नाही...'

एनसीएम इंडिया कौन्सिल फॉर मेन अफेयर्सच्या (NCMIndia Council For Men Affairs) ट्विटर पेजवर दोन नर्सेसने तरुणांना बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.  NCM इंडिया कौन्सिल फॉर मेन अफेयर्सने सांगितले की, “सदर हॉस्पिटल, छपरा, बिहारच्या दोन परिचारिकांनी दोन तरुणांना 4 तासांसाठी ओलीस ठेवले आणि हॉस्पिटलच्या अयोग्य सुविधा व्हिडिओमध्ये कॅप्चर केल्याबद्दल त्यांच्यावर लाठीमार केला. या परिचारिकांवर एफआयआर दाखल झालेला नाही. जिल्ह्याच्या सिव्हिल सर्जनने अशी कोणतीही घटना घडल्याचा नकार दिला आहे.