नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांच्या याचिवेवर त्यांची पत्नी पायल अब्दुल्ला यांना एक नोटीस पाठवून प्रतिक्रिया मागवली आहे. पायल अब्दुल्ला काही दिवसांपासून उब्दुल्ला यांच्यापासून दूर राहतात. तसेच, अब्दुल्ला यांनी याचेमध्ये म्हटले आहे की, आपण तलाक घेऊन दुसरा विवाह करू इच्छितो.
अब्दुल्ला यांनी या कारणासाठी तलाख मागितला आहे की, पती - पत्नी म्हणून आमच्यातील संबंध इतके दुरावले आहेत की, आता ते पुन्हा जोडले जाणे मुश्किल आहे. न्यायमूर्ती सिद्धार्थ मृदूल आणि न्यायमूर्ती दीपा शर्मा यांच्या बेंचने पायल यांना याच मुद्द्यावर नोटीस पाठवली आहे. तसेच, येत्या २३ एप्रिलपर्यंत नोटीसवर उत्तर देण्यास सांगितले आहे.
उमर यांनी तलाकची मागणी करणारे निवेदन त्या याचिकेसोबत आले आहे. ज्यात त्यांनी तलाक मागण्याचा आपली याचिका फेटाळून लावणाऱ्या कनिष्ठ न्यायालयाच्या ३० ऑगस्ट २०१६ च्या आदेशाला वरिष्ठ न्ययालयात आव्हान दिले आहे.
दरम्यान, १ डिसेंबर १९९४ मध्ये उमर अब्दुल्ला यांचा विवाह पायल यांच्यासोबत झाला होता. मात्र, पती पत्नींमध्ये दुरावा आल्याने २००७पासून आपल्याला कौटुंबिक स्वास्थ्य मिळत नाही, असे उमर यांनी न्यायालयात म्हटले आहे. उमर आणि पायल यांना दोन मुले आहेत. जी आपल्या आईसोबत राहतात.