चिंतेत भर ! आणखी एका राज्यात सापडला ओमायक्रानचा रुग्ण

देशातील चिंता वाढवणारी एक बातमी पुढे आली आहे. कारण देशात Omicron चा एक रुग्ण वाढला आहे.

Updated: Dec 4, 2021, 04:10 PM IST
चिंतेत भर ! आणखी एका राज्यात सापडला ओमायक्रानचा रुग्ण

मुंबई : देशाच्या संकटात आणखी एक भर पडली आहे. पीटीआयच्या रिपोर्टनुसार, आणखी एका राज्यात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा (Omicron verient) संसर्ग झालेला रुग्ण आढळला आहे. या व्यक्ती झिम्बाब्वे वरुन परतला होता. गुजरातच्या जामनगरमध्ये ओमायक्रॉनचा (Omicron) रुग्ण आढळल्याने आता भारतात ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या 3 वर गेली आहे.

याआधी बंगळुरुमध्ये 2 व्यक्ती ओमायक्रॉन पॉझिटिव्ह (Omicron Positive) आढळले होते. ज्यामध्ये 46 वर्षीय डॉक्टरला याची लागण झालेली आहे. तर दुसरा एक व्यक्ती दक्षिण आफ्रिकेचा नागरिक आहे. जो निगेटिव्ह रिपोर्टने भारतात आला होता.

देशात आता आंतरराष्ट्रीय प्रवास करुन येणाऱ्या व्यक्तींची चाचणी केली जात आहे. WHO ने म्हटलं आहे की, ओमायक्रॉन हा किती घातक ठरु शकतो हे कळून येण्यासाठी काही आठवडे लागू शकतात. सोबत सध्या उपलब्ध असलेले वॅक्सीन यावर किती प्रभावी ठरु शकतात.

नव्या व्हेरिएंटने संपूर्ण जगाला पुन्हा चिंतेत टाकलं आहे. भारतात देखील आता रुग्ण सापडल्याने अधिक खबरदारी आणि काळजी घेण्याची गरज आहे.