रेशन कार्ड पोर्टेबिलीटी लागू करण्याची ही आहे डेडलाईन

 'एक राष्ट्र-एक राशन कार्ड' योजनेअंतर्गत रेशन कार्ड पोर्टेबिलिटी

Updated: Aug 29, 2020, 08:22 PM IST
रेशन कार्ड पोर्टेबिलीटी लागू करण्याची ही आहे डेडलाईन title=

नवी दिल्ली : 'एक राष्ट्र-एक राशन कार्ड' योजनेअंतर्गत रेशन कार्ड पोर्टेबिलिटी लागू करण्याची वेळ मार्च २०२१ पर्यंत वाढवण्याचा विचार सुरु आहे. पब्लिक डिस्ट्रीब्यूशन सिस्टम (PDS) मध्ये सुधार करण्यासाठी यावर चर्चा झाली. सार्वजनिक वितरण प्रणालीच्या विस्तार परिक्षण आणि मंजुरीसाठी ही बैठक बोलवण्यात आली होती. याच मॅनेजमेंट सिस्टिमद्वारे 'एक राष्ट्र-एक रेशन कार्ड' योजना लागू केली जाणार आहे. 

या योजनेमुळे देशातील बोगस रेशन कार्ड रोखण्यास मदत होणार आहे. देशातील भ्रष्टाचार यामुळे रोखता येणार आहे. या योजनेमुळे एखादी व्यक्ती देशभरात कुठेही गेली तरी तो तिथून रेशन घेऊ शकतो. प्रवासी मजुरांना याचा जास्त फायदा होणार आहे. या लोकांना पूर्ण अन्न सुरक्षा मिळणार आहे. 

या योजनेअंतर्गत राज्यातील रेशन कार्ड पोर्टेबलसाठी टेक्नोलॉजी पर्याय शोधले जाणार आहे. आता पर्यंत केलेली कामे कायम राहण्यासाठी आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी ही योजना आहे. मार्च २०२१ नंतर ही योजना लागू होण्यावर विचार सुरु आहे.