तूतीकोरिन : मालदीव येथे अडकलेल्या १९८ भारतीय नागरिकांना भारतीय वायु दलाच्या जहाजाने (INS) आणण्यात आले आहे. ऐरावत आज तामिळनाडूतील तूतीकोरिन येथे पोहोचले आहे. या जहाजातून आलेल्या सर्व नागरिकांचे स्क्रीनिंग करण्यात येत आहे. तसेच त्यांचे साहित्य सॅनिटाईज करण्यात येत आहे.
#OperationSamudraSetu: Indian Navy Ship (INS) Airavat arrived in Tuticorin (Tamil Nadu) today, carrying 198 Indian citizens who were stranded in Maldives. All the passengers were screened and their luggage was disinfected, upon arrival. pic.twitter.com/kY5tINE6Ne
— ANI (@ANI) June 23, 2020
याआधी मालदीव इथे ७०० पेक्षा जास्त अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी ऑपरेशन समुद्र सेतू सुरु करण्यात आले होते. भारतीय नौदलाच जहाज आय एन एस जलाश्व मालदीवच्या मेल बंदरात दाखल झाले होते. मेल इथे भारतीयांची तपासणी आणि ओळखपत्र वितरणाच काम सुरु झाल्यानंतर त्यांना भारतात आणले गेले.
जागतिक महामारी कोरोना विषाणूच्या संकटामुळे शेकडो भारतीय मालदीवमध्ये अडकले आहेत. मालदीवमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी भारत सरकारने 'ऑपरेशन समुद्र सेतू' मोहीम सुरु केली आहे. त्याअंतर्गत आयएनएस जलाश्व हे नौदल जहाज याआधी माले पोर्टवर ८ मे २०२० रोजी दाखल झाले होते. त्याचवेळी, भारतीय नागरिकांची मायदेशी परत जाण्यापूर्वी त्यांनी आवश्यक ते तपासणी आणि प्रक्रिया पार पाडली. मालदीवमधील भारतीय उच्चायुक्तांनी ही माहिती दिली होती.
ऑपरेशन समुद्र सेतू अंतर्गत मालदीवमधून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी सुरक्षित आणि सुव्यवस्थेने आपली कर्तव्ये पार पाडली. याता पुन्हा एकदा १९८ नागरिकांना आणण्यात आले आहे. कोरोना विषाणूच्या साथीमुळे मालदीवमध्ये अडकलेल्या सुमारे ७५० भारतीयांना अडकले होते.