चीनी सैन्यात पाकिस्तानी अधिकाऱ्यांची तैनाती! मोठ्या षडयंत्राचा प्रयत्न?

चीन आणि पाकिस्तान मिळून काही तरी मोठे षडयंत्र रचत असल्याची शक्यता आहे.  गुप्तचर विभागाच्या माहितीनुसार चीनी सैन्यात पाकिस्तानच्या सैन्य अधिकाऱ्यांची तैनाती करण्यात आली आहे. तसेच अन्य अधिकाऱ्यांना बीजिंग स्थित पाकिस्तानी दुतावसात पाठवण्यात आले आहे.

Updated: Oct 2, 2021, 09:39 AM IST
चीनी सैन्यात पाकिस्तानी अधिकाऱ्यांची तैनाती! मोठ्या षडयंत्राचा प्रयत्न? title=

इस्लामाबाद : पाकिस्तान आणि चीनच्या मोठ्या प्लॅनिंगचा भांडाफोड झाला आहे. गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (PLA) वेस्टर्न आणि सदर्न कमांडमध्ये पाकिस्तानी सैन्य अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. एखाद्या मोठ्या षडयंत्राच्या प्रयत्नात हे पाऊल उचलण्यात आल्याचा अंदाज आहे.

colonel rank च्या अधिकाऱ्यांनी पाठवले.
सदर्न थिएटर कमांडकडे तिब्बेट ऐवजी चीनचे विशेष प्रशासकीय क्षेत्र जसे की, हॉंगकॉंग आणि मकाऊची जबाबदारी आहे. सूत्रांच्या मते, PLAच्या वेस्टर्न आणि सदर्न कमांडमध्ये पाकिस्तानी सैन्य अधिकाऱ्यांनाही पाठवण्यात आले आहे. त्यांना कॉम्बेट प्लॅनिंग आणि ट्रेनिंगची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याशिवाय साधारण 10 पाकिस्तानी सैन्य अधिकारी बीजिंग स्थित पाकिस्तानी दुतावासात तैनात करण्यात आले आहेत.

भारत चौकस आणि चीन-पाकच्या प्रत्येक गोष्टींवर बारीक नजर
पाकिस्तानचे दैनिक द डॉनच्या 2016 मधील एका रिपोर्टमध्ये म्हटले होते की,चीन-पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडोर (CPEC)च्या सुरक्षेसाठी एकूण 15 हजार सैनिकांच्या वेगवेगळ्या युनिट तयार करण्यात आल्या आहेत. चीन आणि पाकिस्तानच्या या कृत्यांवर भारतीय परराष्ट्र आणि संरक्षण मंत्रालय करडी नजर ठेऊन आहे.