Crime News : एका महाविद्यालयामध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या बाचाबाचीनंतर शिक्षकाने विद्यार्थ्यावर गावठी कट्टा रोखल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिक्षकाने कट्टा काढल्यावर बाकी विद्यार्थ्यांमध्ये दहशतीचं वातवरण पसरलं आहे. हे प्रकरण आहे राजस्थानमधील पाली जिल्ह्यातील प्रसिद्ध ओम विश्वदीप गुरुकुल स्वामी महेश्वरानंद आश्रम जादनच्या स्वामी परमानंद महाविद्यालतील आहे.
नेमकं काय आहे प्रकरण
महाविद्यालयात कृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम चालू होता. त्यावेळी माजी विद्यार्थी यशवंत काही कामासाठी आलेला असतो. मात्र त्यावेळी काही कारणावरून तो तिथे शिवीगाळ करण्यास चालू करतो. त्यामुळे शिक्षक हिरा प्रसाद जाट यांनी यशवंतला अडवत आश्रमातून बाहेर काढतात.
हिरा प्रसाद जाट यांनी आपल्याला बाहेर काढल्याचा राग मनात ठेवून तो पुन्हा शुक्रवारी आपल्या मित्रांसह महाविद्यालात येतो. तिथे आल्यावर तो हिरा प्रसाद जाट यांच्याशी भांडू लागतो. त्यावेळी हिरा प्रसाद जाट त्यांचा गावाठी कट्टा बाहेर काढतात.
पोलिसांना आधीच कोणीतरी फोन करून माहिती दिलेली होती. हे सर्व चालू असताना पोलीस पोहोचतात तेव्हा शिक्षक हिरा प्रसाद जाट यांना अटक करतात. त्यासोबतच माजी विद्यार्थ्यासह त्याच्या मित्रांना पोलीस शांती भंग करण्याच्या आरोपाखाली ताब्यात घेतात.