अहमदाबाद : सूरतच्या वराछामध्ये गुरुवारी रात्रा पाटीदार अनामत आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या निवडणूक कार्यालयाच्या उद्घाटनादरम्यान जोरदार गोंधळ घातला.
भाजपचे उमेदवार प्रवीण घोघारी यांच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यानी घोषणाबाजी आणि वाद घातला. त्यानंतर रॅपिड अॅक्शन फोर्स आणि पोलिसांनी चार-पाच लोकांना ताब्यात घेतलं.
पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर पोलीस स्थानकामध्ये देखील गोंधळ घातला गेला. पोलिसांनी लाठीचार्ज करत गर्दीला पांगवण्याचा प्रयत्न केला पण त्यानंतर या कार्यकर्त्यांनी पोलिसांवर लाठीचार्ज केला.
पोलिसांनी काँग्रेसच्या सूरत नॉर्थचे उमेदवार दिनेश काछडिया, वराछा रोडचे उमेदवार धीरू गजेरा, करंजचे उमेदवार भावेश रबारी यांच्यासह 45 लोकांना ताब्यात घेतलं आहे. वाद जेव्हा वाढला तेव्हा पोलिसांनी सगळ्यांना पोलीस स्थाकानात नेलं.