Paytm मधून LPG सिलेंडर बुक केल्यावर 2700 रुपयांचा कॅशबॅक; प्रोसेस समजून घ्या

Paytm मधून कसं बुक कराल गॅस   

Updated: Aug 5, 2021, 09:01 AM IST
Paytm मधून LPG सिलेंडर बुक केल्यावर 2700 रुपयांचा कॅशबॅक; प्रोसेस समजून घ्या  title=

मुंबई : LPG च्या किंमतीत सलग वाढ होत आहे. यामुळे सामान्यांच्या किचनच बजेट बिघडलं आहे. जुलै महिन्यात दर वाढल्यानंतर 14.2 किलो LPG सिलेंडरची किंमत 834.5 रुपये आहे. मात्र जर तुम्ही Paytm मधून गॅस बुक केलं तर तुम्हाला सलग तीन महिने सलग 900-900-900 रुपयांचं कॅशबॅक मिळेल. 

Paytm मधून कसं बुक कराल गॅस 

  • सर्वात अगोदर Paytm App डाऊनलोड करा.
  • त्यानंतर सिलेंडर बुकिंगवर जा. आपल्या गॅस एजन्सीला निवडा. यामध्ये तुम्हाला तीन ऑप्शन दिसतील. भारत गॅस, इंडियन गॅस आणि HP गॅस दिसतील. 
  • यानंतर तुमचा रजिस्टर नंबर टाकून LPG ID किंवा कस्टर नंबर टाका. ही माहिती भरल्यानंतर Proceed च्या बटणावर क्लिक करून पेमेंट करा
  • यानंतर महत्वाची बातमी कॅशबॅक पहिल्यांदा LPG सिलेंडर बुक करणाऱ्यांना ग्राहकांना मिळणार आहे. प्रत्येक महिन्यात तीन गॅस सिलेंडर बुक केल्यावर पहिल्या बुकिंगवर 900 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळेल. ही कॅशबॅक तीन महिनांपर्यंत मिळणार आहे. ही कॅशबॅक 10 रुपये ते 900 रुपयांपर्यंत मिळणार आहे. 
  • यासोबतच Paytm आपल्या कस्टमर्सला देखील खास सुविधा देखील देऊ शकतात. यामध्ये युझर्स आता गॅस बुक करून त्याचं पेमेंट पुढच्या महिन्यात करू शकतात. 

काय आहे कंपनीची स्कीम 

  • Paytm ने युझर्सकरता 3 Pay 2700 Cashback Offer सुरू केलीय 
  • Paytm च्या म्हणण्यानुसार,'युझर्सला प्रत्येक बुकिंगवर 5000 पर्यंत कॅशपॉइट्स मिळणार आहे. यासोबतच शानदार डील आणि टॉप ब्रांड गिफ्ट वाऊचरवर मिळेल.'
  • Paytm ने हल्लीच आपल्या फिचर्सला सिलेंडर बुकिंग जोडून ग्राहकांना चांगला अनुभव दिला आहे. युझर्सला सिलेंडर डिलीवरी ट्रॅक करण्याचा प्रयत्न केलाय. सोबतच फोनवर सिलेंडर बुक करण्याच रिमांइडर देखील दिलं आहे. 
  • Paytm ने गेल्यावर्षी 'बुक ए सिलेंडर' सर्विस सुरू केली आहे. यामध्ये कंपनी सर्वात अगोदर HP शी संबंधीत आहे. यानंतर इंडियन ऑइल आणि भारत गॅससोबत पार्टनशिप केली आहे. या सेवेचा कंपनी आणि ग्राहकांना फायदा होईल.