जाणून घ्या पेट्रोल डिझेलचे आजचे दर

आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये क्रूड ऑईलच्या किंमतीत कपात

Updated: Sep 6, 2019, 08:59 AM IST
जाणून घ्या पेट्रोल डिझेलचे आजचे दर  title=

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये क्रूड ऑईलच्या किंमती कमी झाल्याने शुक्रवारी पेट्रोल डीझेलच्या किंमतीत कपात पाहायला मिळाली. तेल कंपन्यांनी पेट्रोल डिझेलचे दर सलग दुसऱ्या दिवशी कमी पाहायला मिळत आहेत. आज सकाळी पेट्रोलच्या किंमतीत ९ पैसे प्रति लीटर आणि डिझेलमध्ये ६ पैसे प्रति लीटरची कपात पाहायला मिळाली. यासोबतच दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर कमी होऊन ७१.८६ रुपये तर डिझेल ६५.१४ रुपये प्रति लीटर इतके झाले. 

शुक्रवारी सकाळी मुंबईत पेट्रोलचे दर ७७.५४ रुपये तर डिझेल ६८.३१ रुपये प्रति लीटर मिळत आहे. कोलकाता आणि चेन्नईमध्ये पेट्रोलची किंमत क्रमश: ७४.५८ रुपये आणि ७४.६७ रुपये प्रति लीटर आहे. तर डिझेलच्या किंमती कोलकाता आणि चेन्नईमध्ये क्रमश: ६७.५४ आमि ६८.८५ रुपये प्रति लीटर आहेत. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रूडच्या किंमती ५६.३९ प्रति बॅरल आणि बेंट क्रूड ६०.९९ डॉलर प्रति बॅरल स्तरावर पोहोचल्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या दिवसांत पेट्रोल डिझेलच्या किंमतीत आणखी कपात होऊ शकते.