मुंबई : आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol-Diesel Price) दरांनी सामान्यांना घाम फुटला आहे. दुसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झालेली नाही. पण ही दिलासा देणारी बाब नाही. कारण बेलगाम झालेल्या या दरांनी सामान्यांच्या जीवनावर परिणाम केलेला आहे. नवी दिल्लीत पेट्रोलच्या दरांनी रेकॉर्ड रचला आहे. डिझेल ७६ रुपये प्रती लीटरपर्यंत पोहोचले आहेत. मुंबईतही डिझेलच्या दरांनी देखील उंची गाठली आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी दर वाढलेले नाहीत.
देशातील चार मेट्रो शहराव्यतीरीक्त देशातील इतर भागात दर वाढले आहेत. राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये पेट्रोल सर्वाधिक महागलं आहे. येथे सामान्य पेट्रोलचे दर IOC च्या वेबसाइटनुसार ९७.७६ रुपये प्रती लीटर आहे. तर एक्स्ट्रा प्रीमियम पेट्रोलचा दर १००.५१ रुपये प्रती लीटर पोहोचलं आहे. राजस्थानच्या जयपुरमध्ये पेट्रोलचा दर ९३.२२ रुपये प्रती लीटर तर डिझेल ८५.२९ रुपये प्रती लीटर आहे. श्रीगंगानगरमध्ये डिझेलचे दर ८९.४६ रुपये प्रती लीटर आहे.
शहर आजचा दर
दिल्ली ८५.७०
मुंबई ९२.२८
कोलकाता ८७.११
चेन्नई ८८.२९
शहर आजचा दर
दिल्ली ८५.८८
मुंबई ८२.८६
कोलकाता ७९.४८
चेन्नई ८१.१४