PF Balance : प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी पीएफची रक्कम (Pf Amount) फार महत्त्वाची असते. कर्मचाऱ्यांच्या वेतनातून दरमहा एक ठराविक रक्कम ही पीएफ खात्यात जमा केली जाते. कर्मचाऱ्याने कंपनी सोडल्यानंतर ती रक्कम काढता येते. तसेच दुसऱ्या कंपनीत रुजु झाल्यावर आधीची रक्कम त्याच खात्यात ट्रान्सफर करता येते. (pf news know how to online pf withdrawal process)
पीएफमधील रक्कम अडचणीच्या वेळेत काढली जाते. मात्र ही रक्कम कशी काढायची याबाबत अनेकांना माहिती नसते. त्यामुळे एजंटद्वारे अधिकचे पैसे देऊन पीएफ खात्यातून रक्कम काढली जाते. मात्र हीच रक्कम घरबसल्या ऑनलाईन आणि सोप्या पद्धतीने कशी काढायची हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. या पद्धतीमुळे पीएफधारकांचे एजेंटला द्यावे लागणारे पैसेही वाचतील. तसेच फसवणुकीची शक्यताही उरत नाही. त्यामुळे ही बातमी तुमच्या कामाचीच आहे.
- पीएफच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन यूएएन आणि पासवर्ड टाकून लॉगीन करा.
- त्यानंतर ऑनलाईन सर्व्हिस (Onlice Service) या टॅबवर क्लिक करा. त्यानंतर ड्रॉप डाऊन मेन्यूत जाऊन (फॉर्म 19, 31, 10 सी किंवा 10 डी) निवडा.
- बँक अकाउंट नंबर टाका (Bank Account Number) आणि व्हेरिफाय (Verify) करा. त्यानंतर येस (Yes) पर्यायावर क्लिक करा.
- प्रोसिड फॉर ऑनलाईन क्लेम (Proceed for Online Claim) यावर क्लिक करा.
- क्लेम फॉर्ममध्ये 'I Want To Apply For' या पर्यायवर क्लिक करुन आवश्यक असलेल्या पर्यायाची निवड करा.
- पीएफ रक्कम काढण्यासाठी एक फॉर्म निवडावा लागेल. यासाठी पीएफ एडव्हान्स (Form 31) हा फॉर्म निवडा.
- सर्टिफिकेटवर क्लिक करा आणि ऑनलाईन अर्ज जमा करा.
- तुम्ही ज्या उद्देशाने फॉर्म भरला आहात, त्यासाठी कर्मचाऱ्याला स्कॅन स्वरुपातील कागदपत्र सबमिट करायला सांगितलं जाऊ शकतं.
- आवश्यक त्या परवानग्या मिळाल्यानंतर पीएफधारकाच्या खात्यात रक्कम जमा होते.