PM आवास योजनेबाबत सरकारची मोठी घोषणा; लाभार्थ्यांसाठी खूशखबर

PM Awas Yojana: पीएम आवास योजनेबाबत केंद्र सरकारने नवीन घोषणा केली आहे. सरकारच्या नवीन घोषणेचा तुम्हालाही फायदा होऊ शकतो. पंतप्रधान आवास योजना - (ग्रामीण)  2024 पर्यंत सुरू ठेवण्याला मंजूरी दिली आहे.

Updated: Aug 11, 2022, 03:19 PM IST
PM आवास योजनेबाबत सरकारची मोठी घोषणा; लाभार्थ्यांसाठी खूशखबर title=

PM Awas Yojana: पीएम आवास योजनेबाबत केंद्र सरकारने नवीन घोषणा केली आहे. सरकारच्या नवीन घोषणेचा तुम्हालाही फायदा होऊ शकतो. पंतप्रधान आवास योजना - (ग्रामीण)  2024 पर्यंत सुरू ठेवण्याला मंजूरी दिली आहे.

PM आवास योजनेबाबत मोठी घोषणा

सरकारने पीएम आवास योजना(ग्रामीण)अंतर्गत 2.95 कोटी घरे देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. आतापर्यंत साधारण 2 कोटी पक्की घरं तयार करून वाटप करण्यात आली असून अद्यापही अनेक परिवार असे आहेत. ज्यांना गरज असूनही योजनेचा लाभ मिळालेला नाही. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना फायदा होणार आहे.

सरकारने दिली माहिती

सरकारने दिलेल्या माहितीनुसार, या योजनेत केंद्र सरकारचा एकूण खर्च 1,43,782 कोटी रुपये असेल आणि यामध्ये नाबार्डला कर्जाच्या व्याजासाठी 18,676 कोटी रुपयांचा समावेश आहे. या योजनेद्वारे, सरकार 90 टक्के आणि 10 टक्के या आधारावर डोंगराळ प्रदेशातील राज्यांनाही पैसे देते. तर उर्वरित राज्यात 60 टक्के आणि 40 टक्के केंद्र आणि राज्ये देतात. तर केंद्रशासित प्रदेशात सरकार 100 टक्के पैसे खर्च करते.