अखेरचा सॅल्यूट! CDS बिपीन रावत यांना PM नरेंद्र मोदींकडून श्रद्धांजली अर्पण

जनरल बिपीन रावत यांच्यासह इतर 12 जणांचं पार्थिव दिल्लीतल्या पालम एअरबेसवर दाखल 

Updated: Dec 9, 2021, 09:25 PM IST
अखेरचा सॅल्यूट! CDS बिपीन रावत यांना PM नरेंद्र मोदींकडून श्रद्धांजली अर्पण title=

नवी दिल्ली : तामिळनाडूमधल्या कून्नुर इथं हेलिकॉप्टपर अपघातात शहिद झालेल्या जनरल बिपीन रावत यांच्यासह इतर 12 जणांचं पार्थिव आज संध्याकाळी दिल्लीतल्या पालम एअरबेसवर दाखल झालं. 

रात्री 9 वाजता पंतप्रधान मोदी पालम विमानतळावर पोहचले आणि हेलिकॉप्टर अपघातात निधन झालेल्या CDS बिपीन रावत यांच्यासह इतर बारा जणांना आदरांजली वाहिली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल आणि तीन्ही सैन्यदलप्रमुख यावेळी उपस्थित होते. 

दरम्यान, श्रीलंका, नेपाळ आणि भूतानचे वरिष्ठ लष्करी अधिकारी जनरल बिपिन रावत यांच्या उद्या होणा-या अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार आहेत. 

CDS बिपीन रावत यांच्या पार्थिवावर उद्या म्हणजे शुक्रवारी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.