पंतप्रधान मोदींच्या भाषणाने कार्यकारिणी बैठकीचा समारोप

राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीचा शेवटचा दिवस

Updated: Sep 9, 2018, 09:49 AM IST
पंतप्रधान मोदींच्या भाषणाने कार्यकारिणी बैठकीचा समारोप title=

नवी दिल्ली : दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीचा आजचा दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. या बैठकीचा समारोप पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाने होणार आहे. पहिल्या दिवशी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला. २०१९ मध्ये बहुमताने पुन्हा सत्तेत येऊ असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला आहे. यावेळी शाह यांनी काँग्रेसवरही जोरदार टीका केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी मेकिंग इंडियासाठी काम करत असताना काँग्रेस देशाला तोडण्याचं काम करत असल्याचा हल्लाबोल शाह यांनी केला आहे. दरम्यान पुढील वर्षात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या कार्यकाळाला एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे पुढल्या वर्षीची लोकसभाही भाजप अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली लढणार आहे.