मुंबई : पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांसाठी नव नवीन योजना सुरू करीत असते. ज्यामध्ये तुम्ही आपला पैसा सुरक्षित ठेऊ शकता. याच पार्श्वभूमीवर पोस्ट तुमच्यासाठी चांगली योजना घेऊन आले आहे. या स्किमचे नाव आहे पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉजिट!
काय असते RD स्किम
POST OFFICE मध्ये ग्राहकांसाठी Recurring Deposit अकाउंट 5 वर्षासाठी सुरू केले जाते. वार्षिक व्याजदरांनुसार तुमच्या अकाउंटच्या दर 3 महिन्यानंतर व्याज कॅल्युलेट केले जाते. त्यानंतर चक्रवाढ व्याजाला जोडले जाते. पोस्ट ऑफिसच्या मते RD स्किमवर 5.8 टक्क्यांपर्यंत व्याज दिले जाते.
10 हजार गुंतवा आणि 16 लाख मिळवा
जर तुमचे पोस्ट ऑफिसमध्ये अकाउंट आहे. तर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या या स्किममध्ये दर महिना 10 हजार रुपये जमा करीत असाल तर तर 10 वर्षानंतर मॅच्युरिटीवर 16 लाख 26 हजार 476 रुये मिळतील.
RD चा दरमहा हफ्ता ठरलेल्या तारखेला जमा न केल्यास बँक पेनल्टी लावू शकते. प्रत्येक बॅंकांचे याबाबतीत नियम वेगवेगळे आहेत.