नवी दिल्ली : केंद्र सरकार सामान्य लोकांचे हित लक्षात घेऊन अनेक योजना राबवत आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) ही देखील अशीच एक महत्वाची योजना आहे. ज्या अंतर्गत तुम्ही दरमहा फक्त एक रुपया किंवा वर्षभरात फक्त 12 रुपये जमा करून 2 लाख रुपयांचा अपघाती विमा मिळवू शकता. ही योजना अत्यंत कमी प्रीमियममध्ये जीवन विमा प्रदान करते. त्याबद्दल सर्व काही जाणून घेऊया. (Pradhan Mantri Suraksha Bima Yojana Scheme)
मे महिन्यात प्रीमियम
काही वर्षांपूर्वी केंद्र सरकारने अत्यंत कमी प्रीमियमवर प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना सुरू केली होती. PMSBY चा वार्षिक प्रीमियम फक्त 12 रुपये आहे.
त्याचा हप्ता मे महिन्याच्या शेवटी जमा होतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही रक्कम 31 मे रोजी तुमच्या बँक खात्यातून आपोआप कापली जाते. त्यामुळे लक्षात ठेवा की तुम्ही PMSBY घेतला असेल तर तुमचे बँक खाते रिकामे ठेवू नका.
PMSBY च्या अटी आणि नियम
PMSBY योजनेच्या लाभासाठी काही अटी देण्यात आल्या आहेत. याचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय 18 ते 70 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. या प्लॅनचा वार्षिक प्रीमियम फक्त 12 रुपये आहे. म्हणजे फक्त 1 रुपये प्रति महिना.
PMSBY पॉलिसीचा प्रीमियम देखील थेट बँक खात्यातून कापला जातो, म्हणून बँकेत शिल्लक ठेवा. याशिवाय, पॉलिसी खरेदी करताना बँक खाते PMSBY शी लिंक केले जाते.
या योजनेंतर्गत, अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास विमा खरेदी करणार्या ग्राहकावर अवलंबून असलेल्या व्यक्तीला 2 लाख रुपयांची रक्कम दिली जाते.
नोंदणी प्रक्रिया
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही कोणत्याही बँकेच्या शाखेत जाऊन या पॉलिसीसाठी अर्ज करू शकता. बँक मित्रही पीएमएसबीवाय योजना घरोघरी पोहोचवत आहेत. यासाठी तुम्ही विमा एजंटशीही संपर्क साधू शकता. सरकारी विमा कंपन्या आणि अनेक खाजगी विमा कंपन्या देखील ही योजना विकतात.