पंतप्रधान मोदींनी कवितेच्या माध्यमातून विरोधकांना केलं लक्ष्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावरील भाषणात अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.

Updated: Feb 8, 2021, 12:29 PM IST
पंतप्रधान मोदींनी कवितेच्या माध्यमातून विरोधकांना केलं लक्ष्य title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावरील भाषणात बोलताना म्हटलं की, शेतकरी बांधवांनी आपलं आंदोलन मागे घ्यावं, सरकार चर्चेला नेहमीच तयार आहे. कायद्यांबाबत चांगल्या सूचना आल्या तर नेहमीच सुधारणा केल्या जातात. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर पंतप्रधान मोदींनी पावणेदोन तास भाषण केलं. यावेळी त्यांनी विरोधकांनाही सुनावलं.

केंद्राच्या नवीन शेतीविषयक कायदे व शेतकरी निषेधाच्या धर्तीवर राजकारण होत असल्याचं त्यांनी म्हटलं. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निवेदनाचा संदर्भ देताना ते म्हणाले की, विरोधी पक्ष आज शेती सुधारणांवर यू-टर्न का घेत आहेत? पंतप्रधानांनी स्पष्टपणे सांगितले की, काही लोक नवीन कृषी कायद्यांबाबत संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न करीत आहेत. ते म्हणाले, कायद्याबाबत शेतकर्‍यांची प्रत्येक शंका दूर होईल. कोणीही एमएसपी रद्द करू शकत नाही. एमएसपी होती, एमएसपी आहे आणि एमएसपी राहणार.'

'भारत लोकशाहीची जननी आहे'

राष्ट्रपतींच्या भाषणात झालेल्या गोंधळावर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, 'जर सर्वांनी राष्ट्रपतींचे भाषण ऐकले असते तर लोकशाहीची प्रतिष्ठा आणखी वाढली असती. पण राष्ट्रपतींच्या भाषणाची ताकद इतकी होती की न ऐकून ही त्यावर चर्चा झाली. भारताची लोकशाही कोणीही काढून घेऊ शकत नाही.'

आज भारत संधींचा देश

पीएम मोदी म्हणाले, संपूर्ण जग अनेक आव्हानांना सामोरे जात आहे. अशा प्रकारच्या आव्हानांमध्ये मानवजातीला अशा कठीण काळातून जावे लागेल असा विचार कदाचित कोणी केला नसेल. पण हा देश तरुण आहे, देश उत्साहाने भरला आहे. हा देश अनेक स्वप्नांसह दृढनिश्चयाने पूर्ण होण्याचा प्रयत्न करीत आहे, हा देश या संधी कधीही सोडू शकत नाही. आज भारत संधींचा देश आहे. बर्‍याच संधी आपल्या प्रतीक्षेत आहेत.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणामुळे आत्मविश्वास वाढतो

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत सांगितले की, संपूर्ण जग आव्हानांना सामोरे जात आहे. कोणी याबाबत विचार कदाचित केला नसेल. या दशकाच्या सुरूवातीस, आमच्या राष्ट्रपतींनी संयुक्त सभागृहात भाषण केले जे नवीन आत्मविश्वास निर्माण करणारं आहे. हे भाषण म्हणजे स्वावलंबी भारताचा मार्ग दर्शवतो आणि या दशकासाठी मार्ग प्रशस्त करतो.

कवितेच्या माध्यमातून विरोधकांना लक्ष्य

पंतप्रधान म्हणाले की, स्वातंत्र्यांच्या 75 व्या वर्षी आपण प्रवेश करत आहोत ही देखील आपल्या सर्वांसाठी ही एक संधी आहे. हा उत्सव काहीतरी करण्यासाठी आहे. स्वातंत्र्याच्या 100 व्या वर्षी म्हणजे 2047 मध्ये आपण कोठे आहोत याचा आपण विचार केला पाहिजे. आज जग आपल्याकडे पहात आहे. जेव्हा मी संधींबद्दल चर्चा करीत असतो तेव्हा मला मैथिलीशरण गुप्ता यांची कविता म्हणायला आवडेल. 'अवसर तेरे लिए खड़ा है, फिर भी तू चुपचाप पड़ा है. तेरा कर्मक्षेत्र बड़ा है, पल-पल है अनमोल, अरे भारत उठ, आंखें खोल. उन्होंने कहा कि मैं सोच रहा था | पण मी ते २१ व्या शतकात काय लिहीन असा विचार करीत होतो - अवसर तेरे लिए खड़ा है, तू आत्मविश्वास से भरा पड़ा है, हर बाधा, हर बंदिश को तोड़, अरे भारत, आत्मनिर्भरता के पथ पर दौड़.'