PM Modi Gold Statue: गुजरात विधानसभा निवडणुकीतील (Gujrat Assembly Election 2022) भाजपच्या (BJP) ऐतिहासिक विजयाच्यानिमित्ताने गुजरातमधल्या सूरत (Surat) शहरातील एका सोनाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोन्याची प्रतिमा (PM Modi Gold Statue) बनवली आहे. ही मूर्ती बनवण्यासाठी 20 ते 25 जणं तब्बल तीन महिने अथक मेहनत करत होते. पूर्णपणे सोन्याने मढलेल्या या मूर्तीची किमत जवळपास 11 लाख रुपये इतकी आहे. सन्याचे दागिने बनवणऱ्या 'राधिका चेन्स'चे मालक बसंत बोहरा यांनी दिलेल्या माहितीनुसार ही मूर्ती 18 कॅरेट सोन्यापासून बनली आहे. या मूर्तीचं वजन 156 ग्राम इतकं आहे.
2022 मध्ये पार पडलेल्या गुजरात विधानसभा निवडणूकीत भाजपने 182 पैकी तब्बल 156 जागा जिंकत इतिहास रचला. या विजयाने प्रेरित होऊन बसंत बोहरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची सोन्याची प्रतिमा बनवण्याचा निर्धार केला. अनेक जणांनी ही सोन्याची मूर्ती विकत घेण्याबद्दल विचारणा केली पण याबाबत अजून कोणताही निर्णय घेतला नसल्याचं बसंत बोहरा सांगतात.
बोहरा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कट्टर समर्थक आहेत, मोदी यांच्या सन्मानप्रित्यार्थ त्यांना काहीतरी आगळंवेगळं करायचं होतं. यासाठी त्यांनी पंतप्रधान मोदी यांची सोन्याची मूर्ती बनवण्याचा निर्णय घेतला. ही मूर्ती बनवण्यासाठी 20 ते 25 कारागिर काम करत होते, तब्बल तीन महिन्यांच्या अथक मेहनतीनंतर ही मूर्ती पूर्ण तयार झाली आहे. या मूर्तीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावर अनेकांनी प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.
पीएम मोदी यांची सोन्याची नाणी
पंतप्रधान मोदी यांची याआधीही सोन्याची मूर्ती बनवण्यात आली आहे. इंदौर आणि अहमदाबादमधल्या काही व्यापाऱ्यांनी ही मूर्ती बनवली होती. याशिवाय धनोत्रयदशीच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांचे फोटो असलेली सोन्याची नाणीही बनवण्यात आली होती. ही नाणी मोठ्या प्रमाणावर विकली गेली. उत्तरप्रदेशमधल्या मेरठमध्ये एक ज्वेलरी प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं. या प्रदर्शनात पीएम मोदी यांच्या फोटोची सोन्याची नाणी प्रमुख आकर्षण होती.