Printed Samosa : समोसाप्रेमींसाठी (Samosa)बघा जर तुम्ही समोसा घ्यायला जात असाल तर तुमच्या नशिबी तर हा समोसा आला नाही ना...अनेकजण फक्त बटाट्याचे समोसेच पसंत करतात, पण आजकाल अनेक प्रकारचे समोसे बनवले जात आहेत. नूडल्स, पनीर, मॅकरोनी,चिकन आणि चीजवाले समोसे मिळतात आहे. पण सध्या सोशल मीडियावर एक अनोखा समोसा सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
एका ग्राहकाने समोसा पार्टीवरुन (Samosa Party) समोसाची ऑर्डर दिली. त्या दुकानात आलू समोसे, कॉर्न-चीज समोसे, नूडल समोसे, अगदी तंदूरी चिकन टिक्का समोसा आणि मटण कीमा समोसा यांसारखे समोसे मिळतात.एका ट्विटर वापरकर्त्याने बंगळुरू शहरातील समोसांबद्दल एक 'टेक इनोव्हेशन' शेअर केला आहे, जो अगदी अनोखा दिसतो. शोभित बाकलीवाल (Shobhit Bakliwal) नावाच्या व्यक्तीने समोस्यांचा फोटो शेअर केला असून त्यावर 'आलू' आणि 'नूडल्स' प्रिंट आहेत.
समोसा पार्टीच्या ट्विटर (Twitter) अकाऊंटने या नवीन तंत्रामागील कारण स्पष्ट केलं आहे. ते म्हणाले की, ज्या लोकांना विविध प्रकारचे समोसे खायला आवडतात, त्यांना प्रश्न पडतो की समोशाची चव कशी असेल? या तंत्रामुळे लोकांचे प्रश्न सुटतात.
the real food "tech" innovation in bangalore pic.twitter.com/tVfd9Yz0tq
— Shobhit Bakliwal (@shobhitic) October 10, 2022
समोसा पार्टीने असेही सांगितले की, जेव्हा अनेक प्रकारच्या ऑर्डर केल्या जातात तेव्हा समोसा न तोडता ओळखता येतो. यामुळे गोंधळाची स्थिती संपते. यामुळे समोशाचा आस्वाद घेताना ग्राहकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी तो समोशावर छापण्यात आला आहे. मिक्स ऑर्डरच्या बाबतीत, समोसा न फोडता फिलिंग ओळखता येते.
समोसा खाताना सावधान! तुमच्यासोबतही घडू शकतो 'हा' प्रकार
या ट्विटला 2,500 हून अधिक लाईक्स मिळाले आहेत. एका यूजरने लिहिले की, 'मी काही दिवसांपूर्वी राजस्थानमधील (Rajasthan) एका छोट्या शहरात हे घडताना पाहिले आहे. त्यांचे समोसे स्टार्टअप शॉप होते जिथे ते विविध प्रकारचे समोसे देतात.