Udaipur Murder Case: "घटनास्थळी असतो तर आरोपींना ठोकलं असतं"; मंत्री खाचरियावास यांचं धक्कादायक विधान

उदयपूर हत्याकांडप्रकरणी मंत्री प्रताप सिंह खाचरियावास यांनी मोठं वक्तव्य केले आहे. 

Updated: Jun 29, 2022, 06:02 PM IST
Udaipur Murder Case: "घटनास्थळी असतो तर आरोपींना ठोकलं असतं"; मंत्री खाचरियावास यांचं धक्कादायक विधान title=

Rajasthan Minister Pratap Singh Khachariyawas: राजस्थानच्या उदयपूरमध्ये झालेल्या हत्येनंतर संपूर्ण राज्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या घटनेनंतर राज्यात अनेक ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनाही घडल्या आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने अनेक जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू केली आहे. या प्रकरणात दहशतवादी गटाचा सहभाग असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे एनआयएच्या वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांचे पथक उदयपूरला पाठवण्यात आले.  उदयपूर हत्याकांडप्रकरणी मंत्री प्रताप सिंह खाचरियावास यांनी मोठं वक्तव्य केले आहे. 

मंत्री प्रताप सिंह खाचरियावास यांनी सांगितले की, "हत्याकांड धक्कादायक आहे. आरोपींना ठोकलं पाहिजे. मी जागेवर असतो, तर मी ठोकलं असतं. अशा घटना सहन होत नाहीत. सरकारने या दोन्ही आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी. भाजपाने या प्रकरणात राजकारण करू नये. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखाली सरकारने तातडीने कारवाई केली आहे."

दुसरीकडे, मृत कन्हैया लालच्या कुटुंबीयांनी न्यायाची मागणी केली आहे. दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे. यासोबतच पोलिसांवरही निष्काळजीपणाचा आरोप करण्यात आला आहे. तक्रार करूनही पोलिसांनी कारवाई केली नसल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.