Rakesh Jhunjhunwala यांच्या पोर्टफोलिओमध्ये 'हा' ऑटो स्टॉक सामिल; 1 वर्षात तुफान तेजीची शक्यता

Rakesh Jhunjhunwala Portfolio : BSE वर उपलब्ध जून 2022 तिमाहीच्या शेअरहोल्डिंग तपशीलानुसार, राकेश झुनझुनवाला यांनी एस्कॉर्ट्स कुबोटामध्ये 1.39 टक्के (18,30,388 इक्विटी शेअर्स) भागभांडवल खरेदी केले आहे.

Updated: Jul 25, 2022, 12:45 PM IST
Rakesh Jhunjhunwala यांच्या पोर्टफोलिओमध्ये 'हा' ऑटो स्टॉक सामिल; 1 वर्षात तुफान तेजीची शक्यता title=

Rakesh Jhunjhunwala Portfolio: शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी पुन्हा एकदा ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी एस्कॉर्ट्स कुबोटाचा शेअर त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट केला आहे. पूर्वी ही कंपनी एस्कॉर्ट्स लिमिटेड होती. झुनझुनवाला यांनी जून 2022 च्या तिमाहीत (Q1FY23) कंपनीतील 1.39 टक्के हिस्सा खरेदी केला आहे. त्यांनी मार्च 2022 च्या तिमाहीत एस्कॉर्ट्समधील त्यांचा हिस्सा 1 टक्क्यांपेक्षा कमी केला होता. जपानी कंपनी कुबोटाने एस्कॉर्ट्समध्ये भागभांडवल खरेदी केल्यानंतर हे नाव बदलून एस्कॉर्ट्स कुबोटा करण्यात आले. गेल्या एका वर्षात शेअर 48 टक्क्यांनी वाढला आहे.

Escorts Kubota:1.39% खरेदी शेअर

BSE वर उपलब्ध जून 2022 तिमाहीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, राकेश झुनझुनवाला यांनी एस्कॉर्ट्स कुबोटामध्ये 1.39 टक्के (18,30,388 इक्विटी शेअर्स) भागभांडवल खरेदी केले आहे. मार्च तिमाहीत या कंपनीतील त्यांची हिस्सेदारी एक टक्क्यांहून कमी झाली होती. तर, झुनझुनवाला यांच्याकडे डिसेंबर 2021 च्या तिमाहीत एस्कॉर्ट्समध्ये 5.68 टक्के (7.5 दशलक्ष इक्विटी शेअर्स) शेअर्स होते.

ट्रेंडलाइनच्या डेटानुसार, एस्कॉर्ट्स कुबोटा ही झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमधील नवीन गुंतवणूक आहे. जून 2022 च्या तिमाहीत झुनझुनवाला पोर्टफोलिओचा हा एकमेव नवीन स्टॉक आहे.

एस्कॉर्ट्स कुबोटाचा स्टॉक गेल्या एका वर्षात 68 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. 22 जुलै 2022 पर्यंतच्या मागील एका वर्षातील परताव्यावर नजर टाकली तर ती सुमारे 48 टक्के आहे. स्टॉकने 5 एप्रिल 2022 रोजी 1934 रुपयांचा 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. तर 26 जुलै 2021 रोजी शेअरची किंमत 1154 रुपये होती. अशा प्रकारे, एका वर्षात स्टॉकमध्ये सुमारे 68 टक्क्यांनी वाढ झाली.

25 जुलै 2022 रोजी शेअरची किंमत रु. 1,688 इतकी होती. जून 2022 मध्ये स्टॉकमध्ये तीव्र वाढ दिसून आली. गेल्या एका महिन्यात स्टॉकमध्ये 10 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

ट्रेंडलाइननुसार, 30 जून 2022 पर्यंतच्या डेटाच्या आधारे, राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये सध्या 32 स्टॉक आहेत. त्यांची एकूण संपत्ती 25,425.9 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. 

झुनझुनवाला यांना भारताचे वॉरन बफे असेही म्हणतात. किरकोळ गुंतवणूकदार त्याच्या पोर्टफोलिओवर लक्ष ठेवतात. त्यानुसार आपल्या पोर्टफोलिओची रचना करतात. झुनझुनवाला यांनी त्यांच्या आवडत्या क्षेत्रांमध्ये वित्त, तंत्रज्ञान, रिटेल आणि फार्मा स्टॉक यांचा समावेश आहे.