मुंबई : मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि त्यांच्या कुटुंबाची गणती जगभरातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये केली जाते. देशातील सर्वाधिक श्रीमंत कुटुंब म्हणून अंबानींनकडे पाहिलं जातं. प्रसिद्धी आणि चर्चेत असणाऱ्या याच कुटुंबातील एक सदस्य मात्र या साऱ्यापासून काहीशी दूर असते. करोडोंची संपत्ती, नाव हे सारंकाही मागे सोडून प्रेमाखातर मोठं पाऊल उचलणारी ही व्यक्ती म्हणजे मुकेश अंबानी यांची लहान बहीण दीप्ती साळगावकर.
धीरुभाई अंबानी यांनी आपल्या व्यवसायाच्या कक्षा रुंदावण्यास सुरुवात केली, त्याचवेळी ते एका इमारतीमध्ये राहत होते. मुंबईतील या इमारतीमध्ये वासुदेव साळगावकर हे त्यांचे शेजारी होते. पाहता पाहता साळगावकर आणि अंबानी कुटुंबाची मैत्री दृढ झाली. पुढे वासुदेव साळगावर यांच्या निधनानंतर अंबानी कुटुंबानं त्यांचा मुलगा दत्तराज साळगावकर आणि त्यांच्या कुटुंबाला आधार दिला.
असं म्हटलं जातं की दत्तराज साळगावकर आणि दीप्ती पहिल्या नजरेतच एमेकांच्या प्रेमात पडले होते. पाच वर्षांच्या नात्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही कुटुंबांनी त्यांच्या या निर्णयाचं आनंदानं स्वागत केलं. पण, हे लग्न व्यवसाय, संपत्ती, प्रसिद्धी या निकषांच्या आधारे पार पडलं नसून, प्रेम आणि निस्वार्थ प्रेम हाच त्याचा पाया होता. एका मुलाखतीत खुद्द साळगावकर दाम्पत्यानंच ही बाब शेअर केल्याचं म्हटलं जातं.
बिग बी नव्हे, या अभिनेत्यावर होतं रेखा यांचं जीवापाड प्रेम; पाहा, नात्यात का आला दुरावा?
लग्नानंतर दत्तराज गोव्यात जाऊन त्यांचा व्यवसाय सांभाळू इच्छित होते. पण, सुरुवातीला दीप्ती यासाठी तयार नव्हत्या. पुढे मुंबईकर दीप्ती यांनी गोव्यात जाण्याचा निर्णय़ आनंदानं घेतला आणि इथरा राजाश्रय सोडून त्या गोव्यात स्थायिक झाल्या. तिथं जुळवून घेताना दीप्ती यांना बऱ्याच अडचणी आल्या. सुरुवातीच्या काळात त्यांना काही आव्हानांचा सामना कराला लागला, पण आपल्या निर्णयावर त्या ठाम होत्या. नव्यानं त्यांनी कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली आणि पतीला पावलोपावली साथ दिली. प्रेमापुढं पैसा काय, सारं जगही ठेंगणं हे वाक्य या जोडीला आणि त्यांच्या प्रेमकहाणीला खऱ्या अर्थानं पूर्णपणे समर्पित आहे असं म्हणायला हरकत नाही.