गौरी लंकेश हत्येला आरएसएस जबाबदार : रामचंद्र गुहा; संघाने पाठवली नोटीस

सुप्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांना भाजप युवा मोर्चाचे कर्नाटक प्रदेश सचिव करूणाकर खासले यांनी नोटीस पाठवली आहे. रामचंद्र गुहा यांनी 'गौरी लंकेश पत्रिका'च्या संपादिका आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येबाबत विचार व्यक्त करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जबाबदार धरले होते. त्यानंतर त्यांना नोटीस पाठविण्यात आली आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Sep 12, 2017, 07:58 PM IST
गौरी लंकेश हत्येला आरएसएस जबाबदार : रामचंद्र गुहा;  संघाने पाठवली नोटीस title=

नवी दिल्ली : सुप्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांना भाजप युवा मोर्चाचे कर्नाटक प्रदेश सचिव करूणाकर खासले यांनी नोटीस पाठवली आहे. रामचंद्र गुहा यांनी 'गौरी लंकेश पत्रिका'च्या संपादिका आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येबाबत विचार व्यक्त करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जबाबदार धरले होते. त्यानंतर त्यांना नोटीस पाठविण्यात आली आहे.

दै. हिंदुस्तान टाईम्स आणि द स्क्रोल डॉट कॉम या वेबसाईटवर गौरी लंकेश यांच्या हत्येबाबत गुहा यांनी व्यक्त केलेल्या व्यक्तिगत विचाराबाबत त्यांना ही कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. स्क्रॉलसोबत बोलताना गुहा यांनी म्हटले होते, शक्यता आहे की, गौरी लंकेश यांचे मारेकरी हे संघ परिवाराशी जोडलेले असावेत. जसे, डॉ. दाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्येचे जोडलेले आहेत. दरम्यान, याच मुद्द्यावरून गुहा यांना पाठविण्यात आलेल्या नोटीशीत तीन दिवसांत खुलासा करा अन्यथा कारवाईला सामोरे जा, असे म्हटले आहे.

 

सहा सप्टेबरला गौरी लंकेश यांची तीन हल्लेखोरांनी गोळी मारून हत्या केली. गौरी लंकेश या कन्नड भाषेतून प्रसिद्ध होणाऱ्या 'गौरी लंकेश पत्रिका'च्या संपादिका होत्या. संपादिका होण्यापूर्वी त्यांनी पत्रकार म्हणून चांगले काम केले आहे. गौरी लंकेश या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्याशी संबंधीत विचारधारांच्या कडव्या टीकाकार होत्या. लंकेश यांच्या घराबाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजचाही पोलिसांनी तपास केला. मात्र, हेल्मेट घालून आलेल्या आणि गडद रंगाचे कपडे घातलेल्या त्या अज्ञात व्यक्तींचे धागेदोरे मिळू शकले नाहीत.