आता 'पतंजलि'चं दूध, ताक आणि पनीरही!

कंपनी दूध आणि इतर उत्पादन टेट्रा पॅकमध्ये लवकरच लॉन्च करणार 

Updated: Sep 14, 2018, 12:32 PM IST
आता 'पतंजलि'चं दूध, ताक आणि पनीरही!

नवी दिल्ली : योगगुरू रामदेव यांच्या पतंजलिनं गुरुवारी डेअरी, मिनरल वॉटर आणि फ्रोझन व्हेजिटेबल सेगमेंटमध्ये पदार्पण केलंय. पतंजलिनं या क्षेत्रांशी संबंधित पाच नवे उत्पादन लॉन्च केलेत. डेअरी उत्पादनांत दूध, दही, ताक आणि पनीर यांचा समावेश आहे. तर फ्रोजन व्हेजिटेबलमध्ये वाटाणे, मिक्स व्हेज, स्वीट कॉर्न इत्यादी उत्पादनांची सुरुवात करण्यात आलीय. 

रामदेव यांनी दिलेल्या माहितीनुसार, पतंजलि दुधाची किंमत इतर कंपन्यांपेक्षा दोन रुपयांनी कमी असेल. कंपनी दूध आणि इतर उत्पादन टेट्रा पॅकमध्ये लवकरच लॉन्च करणार आहे. 

या निमित्तानं बोलताना रामदेव यांनी 'स्वदेशी'चा संदेश देतानाच डेअरी क्षेत्रातील अमूल ब्रान्डचंही कौतुक केलं.