नवी दिल्ली : राममंदिराच्या मागणीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं केंद्र सरकारला अल्टिमेटम दिलंय. सरकारनं कायदा करुन मंदिर बनवावं, अन्यथा हिंदू समाज यापुढे भीक मागणार नाही. देशानं आणखी एका सहा डिसेंबरसाठी तयार राहवं असं संघाचे सरकार्यवाहं भैय्याजी जोशींनी म्हटलंय. दिल्लीतल्या रामलीला मैदानात संघ आणि विश्व हिंदू परिषदेनं आयोजित केलेल्या विराट धर्मसभेत सरकारला हा इशारा दिलाय.
वादग्रस्त रामजन्मभूमी बाबरी मशीद खटल्यावर सर्वोच्च न्यायालयात जानेवारी महिन्यात सुनावणी होणार आहे.
जर ही सुनावणी लांबणीवर पडली, तर हिंदू समाज हे सहन करणार नाही असं संघांनं म्हटलंय.
उद्यापासून संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू होतंय. अधिवेशनासाठी दिल्लीत आलेल्या प्रत्येक खासदाराची भेट घेऊन मंदिरासाठी अध्यादेश काढण्याच्या मागणीला पाठिंबा देण्याचं निवेदन करण्याची मोहिम विश्व हिंदू परिषदेनं आधीच सुरू केलीय.